Current Affairs of 1 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2016)

राज्याचे नवे पोलीस महासंचालक सतीश माथुर :

 • राज्याचे 40वे पोलीसप्रमुख सतीश माथुर हे 1981 च्या आयपीएस बॅचचे ‘टॉपर’ आहेत.
 • (दि.30 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
 • सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना 22 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
 • पदोन्नतीवर विधि व तंत्रज्ञ (एल अ‍ॅण्ड टी) विभागाचे पहिले महासंचालक बनण्याचा मान त्यांना मिळाला.
 • तसेच त्यानंतर पोलीस गृहनिर्माण व कल्याणनिधी विभाग तर गेल्या 25 एप्रिलपासून ते एसीबीचे प्रमुख होते.
 • माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सलामी देऊन निरोप देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2016)

मुंबई विमानतळाला उत्कृष्ट पर्यटन सेवेचा पुरस्कार :

 • पर्यटन प्रोत्साहनासाठी 2014-15 चा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला आहे.
 • पर्यटन मंत्रालयातर्फे विज्ञान भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
 • पर्यटन व सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा या वेळी उपस्थित होते.
 • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कॉर्पोरेट व्यवहार खात्याचे महाव्यवस्थापक राहुल बॅनर्जी आणि एरो मार्केटिंगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • देशातील 29 शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या या विमानतळावरून दररोज 190 विमाने उड्डाण करतात, तर 85 आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही या विमानतळावरून विमाने पोचतात.
 • काश्‍मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक नेणाऱ्या ‘केसरी टुर्स’चादेखील कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला.

सीआयडीच्या विशेष महानिरीक्षकपदी विजय चव्हाण :

 • पोलीस महासंचालकपदी सतीश माथुर यांच्या नियुक्तीबरोबरच अन्य 14 वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (दि.30 जुलै) करण्यात आल्या.
 • बिनतारी संदेश विभागाचे विशेष महानिरीक्षक विजय चव्हाण यांची राज्य गुन्हा अन्वेषण शाखेच्या महानिरीक्षकपदी तर नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले डॉ.बी. जी. शेखर यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.
 • गृह विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये दहा सहाय्यक अधीक्षक व परिवेक्षाधीन सहाय्यक अधीक्षकांचा समावेश आहे.
 • बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी –
 • शैलेश बलकवडे (पोलीस उपायुक्त नागपूर, पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर), उत्तम खैरमोडे (अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर- पोलीस अधीक्षक राज्य मानवी हक्क आयोग मुंबई), निमित गोयल (अकोला- पालघर उपविभाग), अक्षय शिंदे(नागपूर ग्रामीण-अक्कलकुवा, नंदूरबार), सिंगुरी आनंद (अहमदनगर-अंबेजोगाई, बीड), जयंत मीना (सोलापूर ग्रामीण-अचलपूर, अमरावती), निखील पिंगळे (गोंदिया-सोलापूर ग्रामीण), निलोत्पल वर्धा(अमळनेर-जळगाव), लोहित मतानी (नांदेड-रामटेक, नागपूर), अजयकुमार बन्सल (परभणी-पुसद), दीपक साळुंखे (रामटेक -बुलढाणा) व पंडीत कमलाकर (धर्माबाद-नांदेड)

पटना पायरेट्स प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनचा विजेता : 

 • प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनमध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी विजय मिळवला आहे.
 • हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पटना पायरेट्सने सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळविला.
 • पटनाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला असून, प्रदीपने चढाईत एकूण 16 गुणांची कमाई करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 • जयपूरला स्वतःचा बचाव करताना या परिस्थितीचा उत्तम फायदा उचलत प्रदीपने 16 गुण मिळवले.
 • सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पटना पायरेट्सला फक्त तीन गुण मिळवता आले होते.
 • जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी असतानाही पटनाने अखेरच्या सिझनमध्ये वर्चस्व कायम राखत जयपूरला पराभवाची दिशा दाखविली.
 • पटनाने जयपूरवर 37-29 असा विजय मिळवला. या विजयामुळे पटना पायरेट्सचा हा सलग दुस-यांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा विजेता ठरला.

राज्य शासनाकडून ग्रामपंचायत नोंदींना प्रारंभ :

 • 2010 पासून ग्रामपंचायतींना नोंदीसाठी असलेली बंदी शासनाने उठविली असून, जिल्हा परिषदेने करनोंदी मोहीम हाती घेतली आहे.
 • करवसुलीसाठी सर्वच बांधकामांच्या नोंदी करण्यात येणार असून, बांधकाम करताना विहीत प्राधिकरणाकडून परवानगी घेतली असल्याची कागदपत्रेही दप्तरी दाखल करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
 • तसेच त्यामुळे 2010 नंतर झालेल्या अनधिकृत, अतिक्रमित बांधकामांचा पर्दाफाश होणार आहे.
 • 18 जुलै रोजी शासनाने परिपत्रक काढून 2010 नंतर झालेल्या बांधकामांकडून करवसुलीचे अधिकार ग्रामपंचायतींना पुन्हा दिले आहेत.
 • 10 फेब्रुवारी 2010 रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार कोणत्याही बांधकामास परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याचे कळविले होते.

‘संजीवनी’ शोधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम :

 • मरणासन्न अशा मूर्च्छितावस्थेत असलेल्या व्यक्तीलाही मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे चमत्कारी गुणधर्म असल्याची आख्यायिका असलेली ‘संजीवनी बुटी’चा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकार ऑगस्टपासून एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम हाती घेणार आहे.
 • उत्तराखंडचे ‘आयुष’मंत्री सुरेंद्र सिंग नेगी यांनी सांगितले की, सरकारने या शोधमोहिमेसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 • तसेच त्याशिवाय आयुर्वेदिक वैद्यांसह अन्य तज्ज्ञांची एक समितीही त्यासाठी स्थापन केली आहे.
 • ऑगस्टपासून चीनच्या सीमेलगत असलेल्या चमोली जिल्ह्यातील हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतरांगांमध्ये ‘संजीवनी’चा शोध सुरू केला जाणार आहे.

दिनविशेष :

 • 1774 : जोसेफ प्रीस्टली कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलतत्त्वाचा शोध लावला.
 • 1920 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी.
 • 1936 : बर्लिनमध्ये उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
 • 1960 : बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • 1996 : मायकेल जॉन्सनने 200 मीटर अंतर 19.32 सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.