Current Affaire (चालू घडामोडी) of 14 November 2014 For MPSC Exams

 

 

अ.क्र
 ठळक घडामोडी
1.  रोहित शर्मा चा द्विशतकी विश्वविक्रम
2.  निराधार बालकांसाठी बालआधार योजना
3.  आधार कार्ड आता स्मार्ट कार्ड मध्ये
4.  नासाच्या कसिनी मोहिमेला यश

 

 

 रोहित शर्मा चा द्विशतकी विश्वविक्रम:

  • चौथा एकदिवसीय, भारत-श्रीलंका सामना कोलकत्ता मधील ईडन गार्डन मध्ये  खेळण्यात आला .रोहित शर्मा याचा एकदिवसीय सामन्यातील विश्वविक्रम. १७३  चेंडू, २६४ धावा, ३३ चौकार, आणि ९ षटकारांसह श्रीलंकेपुढे ४०४ रनांचे आव्हान होते.

  • वीरेंद्र सेहवाग (२१९ ) चा विक्रम मोडून नवीन विक्रम तयार केला. रोहित शर्माचे हे दुसरे द्विशतक आहे.

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील हा एक विश्वविक्रम आहे. पण संपूर्ण एकदिवसीय क्रिकेट ईतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या अगोदर इंग्लंडच्या ‘अ’ संघातील अलीस्टेयर ब्राऊनने २६८ धावांचा विश्वविक्रम केला आहे.

 निराधार बालकांसाठी बालआधार योजना:

  • १४ नोव्हेंबर हा पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन व बालदिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांची बालआधार योजनेची घोषणा.
  • ३ वर्षावरील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी बल आधार या नव्या योजनेची घोषणा बालविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

  • १०५२ संस्थांमध्ये ११ हजार ४२४ बालकांचे सर्वांगीण शिक्षण, आरोग्य, व पालन पोषण करण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली.

 आधार कार्ड आता स्मार्ट कार्ड मध्ये:

  • आधार कार्ड चे आता स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. आधार कार्ड चे रूपांतरण अवघ्या ३० रुपयांत स्मार्ट कार्ड मध्ये करून मिळणार.

  • ह्या योजनेचा शुभारंभ टेंभली या गावापासून झाला.

 नासा चा कसिनी मोहिमेला यश:

  • नासा ची नव कसिनी मोहिमेला यश प्राप्त झाले. लालसर डागाचे रहस्य या मोहिमेमुळे गुरवारी उघडकीस आले.

  • नासाचा या मोहिमेत लालसर डाग हा सूर्यामुळेच आहे हे उघडकीस आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.