Current Affairs (चालू घडामोडी) of 24 November 2014 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
2. मॅग्नस कार्लसन ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता
3. दोन भारतीय ख्रिस्त धर्मगुरूंना मिळाला ‘संत’ पदाचा बहुमान
4. शिव मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी
5. पंडित बिर्जू महाराज यांना आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार

 

सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना:

 • सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत एक किवा दोन मुलींवर थांबणार्‍याना प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
 • मुलगी एक असेल तर आईला रोख 2 हजारमुलीच्या नावे 8 हजार रुपयांची ‘एफडी’ (Fixed Deposit) केली जाणार आहे.
 • 2 मुली असतील तर मातेस रोख 2 हजारदोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 4 हजार ‘एफडी’ केली जाईल. ‘एफडीची’ रक्कम मुलीच्या 18 वर्षांनंतर मिळेल.

 

मॅग्नस कार्लसन ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता:

 • कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.
 • कार्लसन सलग दुसर्‍यांदा जगज्जेतेपद मिळवले आहे तर आनंदने आत्तापर्यंत पाचवेळा विजेतेपद मिळवले आहे.
 • नॉर्वेचा अव्वल मानांकीत मॅग्नस कार्लसन याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद चा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.

 

दोन भारतीय ख्रिस्त धर्मगुरूंना मिळाला ‘संत’ पदाचा बहुमान:

 • विश्वातील एकूण पाच धर्मगुरूंना मिळाले ‘संत’ पद; त्यात भारताचे फादर कुरीयाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळ चा दोन कॅथॉलिन ख्रिश्चन धर्मगुरूंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ‘संत’ पद बहाल केले.
 • यापूर्वी 2008 मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना ‘संत’ पद मिळाले होते.
 • केरळच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलीक चर्चमधील आतापर्यत तिघांना ‘संत’ पद देण्यात आले आहे.

 

शिव मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी:

 • थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे.
 • हे मंदिर यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्यांच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहे.

 

पंडित बिर्जू महाराज यांना आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार:

 • आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार विख्यात कथ्थक गुरु ‘पंडित बिर्जू महाराज‘ यांना शनिवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई समारंभापूर्वी देण्यात आला.
 • संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.
You might also like
1 Comment
 1. Gajanan nikam says

  Superb this page

Leave A Reply

Your email address will not be published.