विशेषणांची तुलना

विशेषणांची तुलना

Must Read (नक्की वाचा):

विशेषण व त्याचे प्रकार

खालील वाक्ये वाचा. –

  1. Rama’s mango is sweet.
  2. Hari’s mango is sweeter than Rama’s.
  3. Govind’s mango is the sweetest of all.
  • पहिल्या वाक्यात sweet हे विशेषण केवळ रामच्या आंब्याला गोडी आहे हा गुणधर्म सांगते. पण तो गुणधर्म किती हे सांगत नाही.
  • दुसर्‍या वाक्यात sweeter हे असे सांगते की हरीच्या आंब्याला रामाच्या (आंब्याच्या) तुलनेत गोडीचा गुणधर्म अधिक आहे.
  • तिसर्‍या वाक्यात sweetest हे विशेषण असे सांगते की या सर्व आंब्यांमध्ये गोविंदाच्या आंब्यात सर्वाधिक मात्रेत गोडाचा गुणधर्म आहे.
  • अशाप्रकारे आपणास असे दिसते की, तुलना दाखविण्यासाठी विशेषणांची रुपे बदलतात.
  • उदा. sweet, sweeter, sweetest यांना तुलनेचे तीन भाव (Degrees of Comparison) असे म्हणतात.
  • sweet हे विशेषण समभावात (Positive Degree) आहे असे म्हंटले जाते.
  • sweeter हे विशेषण तर भावात (Comparative Degree) आहे असे म्हटले जाते.
  • sweetest हे विशेषण तम भावात (Superlative Degree) आहे असे म्हंटले जाते.
  • विशेषणाच्या सम भावामध्ये (Positive Degree) विशेषण हे आपल्या मूळ रूपात असते. ते आपण ज्याविषयी बोलतो त्याच्या एखाधा गुणधर्माचे फक्त अस्तित्व दर्शविण्यासाठी वापरतात. परंतु जेव्हा तुलना नसते तेव्हाच त्याचा उपयोग होतो.
  • Comparative Degree मध्ये विशेषण हे समभावापेक्षा (Positive) गुणधर्माचा उच्चतर भाव (Higher degree) दर्शविते.
  • जेव्हा दोन वस्तु किंवा वस्तूंचे संच (set of things) यांची तुलना केली जाते तेव्हा अशा प्रकारची विशेषणे वापरतात.

उदा.

  1. This boy is stronger than that.
  2. Which of these two pens is the better?
  3. Apples are dearer than oranges.
  • superlative Degree मध्ये विशेषण हे गुणधर्माचा उच्चतर भाव दर्शविते आणि दोनपेक्षा जास्त वस्तु अथवा वस्तूंचे संच यांची तुलना केलेली असते तेव्हा अशाप्रकारची विशेषणे वापरतात.
  • उदा.This boy is the strongest in the class.
  • टीप 1- वस्तूंची तुलना दुसर्‍या प्रकारेदेखील करता येते.
  • Rama is stronger than Balu म्हणण्याऐवजी आपण Balu is less strong than Rama असे म्हणू शकतो. Hari is the laziest boy in the class म्हणण्याऐवजी Hari is the least industrious in the class असे म्हणू शकतो.
  • टीप 2– जेव्हा तुलनेचा विचार नसतो पण केवळ गुणधर्माचा अत्युच्च भाव (Superlative) दर्शविण्याची इच्छा असते तेव्हा कधीकधी तमभावातील Most चा वापर करतात.

उदा.

  1. This is most unfortunate.
  2. It was a most eloquent speech.
  3. Truly, a most ingenious device!
  • अशा वापराला अत्युच्च तमभाव (Superlative of Eminence) अथवा अमर्याद तमभाव (Absolute Superlative) असे म्हटले आहे.  

तर आणि तम भावांची रचना (FORMATION OF COMPARATIVE AND SUPERLATIVE) :

  • एक शब्द+अव्यय (syallable) असलेली बरीचशी विशेषणे आण एकापेक्षा अधिक शब्दावयव (Syllabe)असलेली काही विशेषणे यांच्या समभावतील रूपाला (Positive) er जोडून तर भाव (Comparative) आण est जोडून तम भाव (Superlative) तयार होतो.

जसे –

Positive        Comparative Superlative
Clever         cleverer      cleverest
Bold             bolder boldest
Tall            taller     tallest
Small          smaller    smallest
Sweet         sweeter   sweetest

जेव्हा मूळ (Positive) समभावाच्या शेवटी e असते तर, तरभावात फक्त r आणि तमभावात st लावतात.

Brave               braver bravest
White        whiter       whitest
Able              abler ablest
Large           larger      largest
Fine           finer    finest
Noble         nobler     noblest

जेव्हा मूळ (Positive) समभावाच्या शेवटी y असेल आणि y च्या आधी व्यंजन (consonant) असेल तर er आणि est लावायच्या आधी y ला i मध्ये परिवर्तित करतात. (y चा i केला जातो)

Happy       happier   happiest
Wealthy             wealthier wealthiest
Merry             merrier    merriest
Heavy        heavier   heaviest
Easy           easier     easiest

जर समभावातील Positive एकाक्षरी (syallable) असेल आणि त्याच्या शेवटी केवळ एक व्यंजन असेल, त्या व्यंजनाआधी र्‍हस्व स्वर (Short Vowel) असेल तर er आणि est लावण्याआधी पहिले व्यंजन (consonant) दोनदा लावले जाते. (double)

Red        redder   reddest
Fat           fatter     fattest
Sad             sadder saddest
Thin        thinner   thinnest
Hot              hotter  hottest
Big        bigger   biggest

दोनपेक्षा जास्त शब्दावयव (syllables) असणार्‍या विशेषणाच्या समभावला (Positive) more आणि most जोडून तर आणि तमभाव तयार करतात.

Positive        Comparative Superlative
Industrious    more industrious most industrious
Difficult        more difficult most difficult
Beautiful       more beautiful most beautiful
Splendid        more splendid most splendid
  • दोन शब्दावयव असणारी विशेषणे ज्यांचा शेवट full उदा. useful, less (उदा. hopless), ing(e.g. boring) आणि ed(उदा. surprised) तसेच इतर अनेक (उदा. modern, recent, foolish, famous, certain) यांनी होतो. त्यांना More आणि Most लागते.
  • खालील शब्दांना एकतर er आणि est किंवा more आणि most लागते.
  1. The new palace is more splendid than the old one.
  2. Which do you consider his most splendid victory?
  3. Abdul is more courageous than Karim.
  4. Rahim is the most courageous boy in the village.
  • एकाच व्यक्ति किंवा वस्तूच्या दोन गुणधर्मांची तुलना करताना तर भावात (Comparative Degree) er वापरत नाहीत. जर आपल्याला असे सांगायचे असेल की (the Courage of Rama is greater than the courage of Balu) तर असे म्हणता येईल –
  • Rama is braver than Balu
  • पण जर आपल्याला असे सांगायचे असेल की ‘the courage of Rama is greater than his prudence’ तर आपल्याला असे म्हणावे लागेल –
  • Rama is more brave than prudent.
  • जेव्हा दोन गोष्टींची आपसात तुलना करतात तेव्हा तुलनेतील दुसर्‍या गोष्टीमध्ये पहिल्या गोष्टीचा अंतर्भाव करू नये.
  • उदा. Iron is more useful than any other metal.
  • जर आपण म्हंटले – Iron is more useful than any metal
  • तर त्याचा अर्थ असा म्हणण्यासारखा होईल.
  • ‘Iron is more useful than iron’  
  • कारण लोखंड (iron) पण एक धातूच (Metal) आहे.

अनियमित तुलना (IRREGULAR COMPARISON) :

खालील विशेषणांची तुलना अनियमित आहे. म्हणजेच त्यांचे तर (Comparative) आणि तम (Suprlative) भाव समभावापासून तयार झालेले नाहीत.

समभाव               तरभाव   तमभाव
Many                more most(number)
Much         more    most(quantity)
Little          less, lesser   least
Bad, evil, ill        worse worst
Good, well         better  best
Positive         Comparative Superlative
  • Later,latter,latest,last यात Latter आणि Last ही स्थळदर्शक/स्थानवाचक (position) आहेत. तर Later आणि Latest समय सूचकता दर्शवितात.
  1. He is later than I expected.
  2. I have not heard the latest news.
  3. The latter chapters are lacking in interest.
  4. The last chapter is carelessly written.
  5. Ours is the last house in the street.
  • Elder, older, eldest, oldest यात Elder आणि eldest चा वापर फक्त व्यक्तींसाठी होतो. प्राणी किंवा वस्तूंसाठी होत नाही. आजकाल त्यांचा वापर एकाच कुटुंबातील सदस्यांसाठी मर्यादित आहे. elder हा शब्द than बरोबर वापरत नाहीत. Older आणि Oldest व्यक्ति व वस्तु दोन्हीसाठी वापरतात.
  1. John is my elder brother.
  2. Tom is my eldest son.
  3. He is older than his sister.
  4. Rama is the oldest boy in the eleven.
  5. This is the oldest temple in Kolkata.
  • Farther आणि Further दोहोंचा वापर अंतर व्यक्त करण्यासाठी होतो. Farther नव्हे तर Further हे अधिक्य या अर्थी वापरतात. (अधिक्य – additional)
  1. Kolkata is farther/further from the equator than Colombo.
  2. After this he made no further remarks.
  3. I must have a reply without further delay.
  • Nearest म्हणजे सर्वात कमी अंतर
  • Next हा शब्द एक मागोमाग एक येणार्‍या वस्तूंच्या मालिकेतील एकाचा उल्लेख करते.
  1. Mumbai is the seapost neaest to Europe.
  2. Where is the nearest phone box?
  3. Karim’s shop is next to the Post Office.
  4. My uncle lives in the next house. 
        
  • काही इंग्रजीत तर भावांचा (English comparatives) अर्थ संपुष्टात आला आहे आणि ते समभावातच (Positive) वापरले जातात. त्याच्यापुढे than लावत नाहीत. ती अशी आहेत –
  1. Former, latter, elder, hender, upper, neither, inner, outer, utter.
  2. Both the tiger and the leopard are cats; the former animal is much larger than the (latter.)
  3. The inner meaning of this letter is not clear.
  4. The soldiers ran to defend the outer wall.
  5. My elder brother is an engineer.
  6. This man is an utter fool.
  • Latin भाषेपासून घेतलेल्या काही तर भावांची (Comparatives) समभावात्मक (Positive) व तमभावात्मक (Superlative) रुपे नाहीत. त्यांचा शेवट er च्या ऐवजी or ने होतो. ये एकूण 12 आहेत. त्यापैकी 5 विशेषणांच्या तुलनात्मक अर्थ (comparative meaning) संपुष्टात आला आहे. आणि त्यांचा वापर फक्त समभावतील विशेषणे (Positive Adjectives) म्हणूनच होतो. ती अशी आहेत –
  1. Interior, exterior, ulterior, major, minor.
  2. The exterior wall of the house is made of stone; the interior walls are of wood.
  3. His age is a matter of minor importance.
  4. I have no ulterior motive in offering you help.
  • इतर सात विशेषणे तर भाव विशेषणे (Comparative Adjectives) म्हणून वापरतात. परंतु त्या विशेषनांतर than च्या ऐवजी to लावता.
  • तर भाव (Comparative Degree) विशेषणांपूढे सर्वसाधारणत: than लावतात. परंतु – or नी शेवट होणार्‍या तरभाव विशेषणांना (Comparative Adjectives) पुढे शब्दयोगी अव्यय (Preposition) to लावतात.
  • उदा. Inferior, superior, prior, anterior, posterior, senior, junior.
  1. Hari is inferior to Ram in intelligence.
  2. Rama’s intelligence is superior to Hari’s.
  3. His marriage was prior to his father’s death.
  4. He is junior to all his colleagues.
  5. All his colleagues are senior to him.
  • काटेकोरपणे बोलायचे झाले तर, अशी विशेषणे जी, गुणधर्म व्यक्त करतात परंतु ज्यांचे तीन भाव होत नाहीत त्यांची तुलना करू शकत नाही.
  • उदा. Square, round, perfect, eternal, unversal, unique.
  • खर तर एखादी गोष्ट more square, more round, more perfect असू शकत नाही. तरीही आपण म्हणतो.
  • उदा. This is the most perfect specimen I have seen.

तुलनात्मक भावांचे आपसात परिवर्तन (Interchange of the Degrees of Comparison) :

खालील उदा. मध्ये दाखविल्याप्रमाणे; वाक्याचा अर्थ न बदलता विशेषणाच्या तुलनात्मक भावांचे आपसात परिवर्तन होते.

Superlative      Lead is the heaviest of all metals.
Comparative       (Shakuntala) is better than any other drama is Sanskrit.
Superlative        (Shakuntala) is the best drama is Sanskrit.
Comparative        Soloman was not wiser than he is.
Positive          He is as wise as Soloman.
Positive           Panchgani is not so cool as Mahabaleshwar.
Comparative        Mhabaleshwar is cooler Panchgani.
Comparative       Lead is heavier than all other metals.

Must Read (नक्की वाचा):

नाम : विभक्ती

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.