विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण व त्याचे प्रकार

Must Read (नक्की वाचा):

नाम : विभक्ती

  • खालील वाक्ये वाचा –
  1. Sita is a clever girl. (Girl of what kind?)(कशी मुलगी?)
  2. I don’t like that boy. (Which boy?) (कोणता मुलगा?)
  3. He gave me five mangoes. (How many mangoes?)(किती आंबे?)  
  4. There is little time for preparation. (How much time?) (किती वेळ?)
  • पहिल्या वाक्यात clever हा शब्द सीता ही मुलगी कशा प्रकारची आहे हे दाखविते किंवा वेगळ्या शब्दात clever हा शब्द sita या मुलीचे वर्णन करतो.
  • दुसर्‍या वाक्यात, that हा शब्द आपण कोणत्या मुलाविषयी बोलत आहोत, याचा उल्लेख करतो.
  • तिसर्‍या वाक्यात five हा शब्द त्याने मला किती आंबे दिले हे दाखवितो.
  • चौथ्या वाक्यात, little हा शब्द तयारीसाठी किती वेळ आहे हे दाखवितो.
  • नामा बरोबर उपयोगात आलेल्या असा शब्द जो नामाने उल्लेखिलेल्या व्यक्ती, प्राणी, स्थळ अथवा वस्तू यांचे वर्णन करतो/किंवा यांच्याकडे निर्देश करतो/किंवा त्यांची संख्या (परिमाण) सांगतो, त्याला विशेषण असे म्हणतात.
  • तेव्हा आपण अशी व्याख्या करू शकतो की, विशेषण म्हणजे नामाबरोबर येणारा असा शब्द जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो.
  • विशेषण (Adjective) चा अर्थ आहे विशेष माहिती (added to)
  • खालील वाक्ये पहा –
  1. The lazy boy was punished
  2. The boy is lazy.
  • पहिल्या वाक्यात lazy हे विशेषण boy या नामा बरोबर गुणदर्शक (epithe) किंवा वर्णन करणारे (attribute)म्हणून आले आहे. यामुळे हे विशेष गुणवाचक (attributively) म्हणून वापरले गेले आहे असे म्हणतात.
  • दुसर्‍या वाक्यात lazy हे विशेषण is या क्रियापदाबरोबर वापरले आहे; आणि विधेयचा एक भाग आहे. त्यामुळे हे विशेषण विधेयवाचक (Predicative) असे म्हणतात.
  • काही विशेषणे फक्त विधेयवाचक (Predicative) म्हणूनच वापरता येऊ शकतात.

उदा.

  1. She is afraid of ghosts.
  2. I am quite well.

विशेषणांचे प्रकार (KINDS OF ADJECTIVE) :

  • विशेषनांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करता येईल.
  • गुणवाचक विशेषण (Adjectives of Quality किंवा Descriptive Adjective) व्यक्ती किंवा वस्तूचा प्रकार (kind) किंवा गुण (Quality) दाखवितात.

उदा.

  1. Kolkata is a large city.
  2. He is a honest man.
  3. The foolish old crow tried to sing.
  4. This is a Grammar of the English language.
  • (विशेषनामांपासून (Proper Nouns) बनणार्‍या विशेषणांना (उदा. French wines, Turkish tobacco, Indian tea) कधीकधी Proper Adjective असेही म्हटले जाते. यांचे वर्गीकरण साधारणपणे गुणदर्शक विशेषणाबरोबर केले जाते.)
  • गुणदर्शक विशेषणे (Adjectives of Quality) ही कशा प्रकारचे? या प्रश्नाचे उत्तर देतात.
  • परिमाणदर्शक विशेषणे (Adjectives of Quanitity) ही एखादी गोष्ट किती? (किती परिमाणात आहे) हे दाखवितात.

उदा.

  1. I ate some rice.
  2. He showed much patience.
  3. He has little intelligence.
  4. We have had enough exercise.
  5. He has lost all his wealth.  
  6. You have no sense.   
  7. He did not eat any rice.
  8. Take great care of your health.
  9. He claimed his half share of the booty.
  10. There has not been suffecient rain this year.
  11. The whole sum was expended.
  • परिमाणवाचक विशेषणे (Adjectives of Quantity) ही परिमाणाने किती? प्रश्नाचे उत्तर देतात.
  • संख्या विशेषणे किंवा सांख्यिक विशेषणे (Adjectives of Number किंवा Numeral Adjectives) ही किती व वस्तूंचा अथवा व्यक्तींचा संदर्भ अभिप्रेत आहे किंवा व्यक्ती अथवा वस्तू कुठल्या क्रमाने आहेत हे दाखवितात.
  1. The hand has five fingers.
  2. Few cats like cold water.
  3. There are no pictures in this book.
  4. I have taught you many things.
  5. All men must die.
  6. Here are some ripe mangoes.
  7. Most boys like cricket.
  8. There are several mistakes in your exercise.
  9. Sunday is the first day of the week.
  • संख्यावाचक विशेषणे (Adjectives of Number) ही संख्येने किती? या प्रश्नाच्या उत्तरात वापरले जाते.
  • संख्या विशेषणांचे तीन प्रकार आहेत.

i. निश्चित संख्या विशेषणे (Definite Numeral Adjectives) म्हणजे जी अचूक संख्या दर्शवितात.

उदा.

  1. One, two, three, etc.     ही गुणनादर्शक (Cardinals) आहेत.
  2. First, second, third, etc.     ही क्रमसूचक (Ordinals) आहेत.

(गुणनादर्शक (cardinal) परिमाणे किती हे दर्शविते. क्रमसूचक (Ordinal) मालिकेतील वस्तूंची क्रमवारी दर्शविते. असे दिसते की, क्रमसुचके ही खरोखरच दर्शक विशेषणांचे कार्य करतात. (बघा

ii. अनिश्चित संख्या विशेषणे (Indefinite Numeral Adjective) जी निश्चित अशी संख्या दर्शवित नाहीत.

उदा. All, no; many, few; some, any; certain, several, sundry.

iii. व्यक्तिवाचक संख्या विशेषणे (Distributive Numeral Adjectives) जी संख्येतील प्रत्येकाचा उल्लेख करतात.

उदा.

  1. Each boy must take his turn.
  2. India expects every man to do his duty.
  3. Every word of it is false.
  4. Either pen will do.
  5. On either side is a narrow lane.
  6. Neither accusation is true.

समान विशेषणांची त्यांच्या उपयोगितेनुसार परिमाणवाचक (Quanitity) किंवा संख्यावाचक (Number) म्हणून वर्गवारी करता येईल.

उदा.

परिमाणवाचक संख्या                            विशेषणे

Adjectives of Quantity            Adjectives of Number

  1. I ate some rice.                Some boys are clever.
  2. He has lost all his wealth.  All men must die.
  3. You have no sense.          There are no pictures in this book.
  4. He did not eat any rice.     Are there any mango-trees in this garden?
  5. I have enough sugar.        There are not enough spoons.
  • दर्शक विशेषणे (Demonstrative Adectives) ही कोणती वस्तु किंवा व्यक्ति अभिप्रेत आहे याचा निर्देश करतात. दर्शक विशेषणे (Demonstrative Adjectives) कोणते? या प्रश्नाचे उत्तर देतात.
  1. This boy is stronger than Hari.
  2. That boy is industrious.
  3. These mangoes are sour.
  4. Those rascals must be punished.
  5. Raigad fort once belonged t Shivaji.
  6. Don’t be in such a hurry.
  7. I hate such things.
  • असे लक्षात येते की, This & That यांचा उपयोग एकवचनी नामां (Singular noun) बरोबर होतो आणि these आणि those चा उपयोग अनेकवचनी (Plural nouns) नामांबरोबर होतो.
  • जेव्हा what, which & whose हे नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक विशेषणे (Interrogative Adjectives) असे म्हणतात.

उदा.

  1. What manner of man is he?
  2. Which way shall we go?
  3. Whose book is this?
  • (असे दिसते की, what या शब्दाचा वापर रुढर्थाने (gerneral sense) केला जातो आणि which या शब्दाचा वापर काही विशिष्टार्थाने (selective sense)  केला जातो).
  • खालील वाक्यातील Own आणि Very ही जोर देणारी विशेषणे (Emphasizing Adjectives) म्हणून वापरली आहेत.

उदा.

  1. I saw it with my own eyes.
  2. He was beaten at his own game.
  3. Mind your own business.
  4. He is his own master.
  5. That is the very thing we want.
  6. “When all else left my cause.
  7. My very adversary took my part.”
  • what या शब्दाचा वापर कधीकधी उद्गारवाचक विशेषणे (Exclamatory Adjectives) म्हणून करतात.

उदा.

  1. What genius!
  2. What folly!
  3. What an idea!
  4. What a blessing!
  5. What a piece of work is man!
  • पूर्वी सांगितल्याप्रमाणे (74) फक्त this आणि that ही अशी विशेषणे आहेत ज्यांची रुपे वचन दर्शविण्यासाठी बदलली जातात.

उदा.

  1. This girl sings.        
  2. These girls sing.
  3. That boy plays.        
  4. Those boys play.
  • This, these हे वक्त्यापासून जवळील काहीतरी दर्शवितात.

विशेषण रचना (FORMATION OF ADJECTIVES) :

i. बरीचशी विशेषणे नामांपासून बनविली जातात. –

नाम(Noun)         विशेषण(Adjective)
Silk        silken
Shame       shameless
Trouble        troublesome
Venture        venturesome
Hope        hopeful
Play        playful
Care         careful
Fool         foolish
Boy            boyish

ii. काही विशेषणे क्रियापदांपासून बनविली जातात. – 

क्रियापद(Verb)    विशेषण(Adjective)
Talk        talkative
Cease        ceaseless
Move       moveable
Tire        tireless

iii. काही विशेषणे इतर विशेषणांपासून बनविली जातात. –

विशेषण(Adjective)    विशेषण(Adjective)
Whole        wholesome
Three       threefold
Black         backish
White         whitish
Sick        sickly
Tragic       tragical

Must Read (नक्की वाचा):

नाम : लिंग

You might also like
1 Comment
  1. Umesh surwade says

    Save this massage

Leave A Reply

Your email address will not be published.