भारतीय पुरावा कायदा 1872 विषयी संपूर्ण माहिती

Bhartiya Purava Kayada 1872

भारतीय पुरावा कायदा 1872च्या प्रास्ताविक आणि व्याख्या

 • कलम 1 – संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
 • कलम 2 – अधिनियमितीचे निरसन
 • कलम 3 – व्याख्या
  1) कोर्ट/न्यायालय
  2) गोष्ट, तथ्य, वस्तूस्थिती
  3) लागू गोष्ट, संबंध
  4) मुद्दे गोष्ट, वादतथ्ये
  5) पुरावा
  6) शाबीत/सिद्ध होणे.
  7) नाशाबीत/सिद्ध न होणे.
  8) बिनाशाबीत/संपूर्ण सिद्ध न होणे.
 • कलम 4 – गृहीत धरता येईल.
भारतीय पुरावा कायदा 1872च्या तथ्यांच्या संबंधतेविषयी
 • कलम 8 – हेतू-पूर्व तयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन.
 • कलम 9 – संबंध तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी आवश्यक असलेली तथ्ये.
 • कलम 24 – प्रलोभन, धमकी किंवा वचन याव्दारे घेतलेला कबुली जवाब ग्राह्य/लागू नसतो.
 • कलम 25 – पोलीस अंमलदारासमोर दिलेला कबुली जबाब ग्राह्य/लागू नसतो.
 • कलम 26 – पोलीस कस्टडीत असतांना दिलेला कबुली जबाब ग्राह्य/लागू नसतो. परंतु पी.सी.आर. कालावधीत दंडाधिकार्‍यासमोर दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य असतो.
 • कलम 27 – पोलीसांच्या ताब्यात असतांना दिलेला कबुली जबाब केव्हा ग्राह्य/लागू असतो.
टीप – खाली दिलेल्या गोष्टींचा समावेश असेल तर पोलीसांच्या ताब्यात असतांना दिलेला कबुली जबाब ग्राह्य असतो. आरोपीवर गुन्ह्याचा चार्ज पाहिजे. तो अटकेत किंवा पोलीसांच्या ताब्यात पाहिजे. पंचासमक्ष सविस्तर निवेदन केले पाहिजे. लपविलेला माल काढून दिला पाहिजे. दिलेला माल गुन्ह्याशी संबंधीत असला पाहिजे.
 • कलम 28 – प्रलोभन, धमकी किंवा वचन यांचा परिणाम नाहीसा झाल्यानंतर दिलेला कबुली जबाब ग्राह्य असतो.
 • कलम 29 – विशिष्ट प्रसंगी दिलेला कबुली जबाब केव्हा ग्राह्य/लागू असतो.
  आरोपीला गुप्ततेचे वचन दिलेले नसेल किंवा आरोपीने दारूच्या नशेत जबाब दिलेला नसेल अशा परिस्थिती दिलेला कबुली जबाब ग्राह्य असतो.
 • कलम 30 – एका आरोपीचा कबुली जबाब इतर आरोपींविरुद्ध वापरता येतो.
 • कलम 31 – एखाद्या व्यक्तीने केलेले निवेदन त्याच्यावर बंधनकारक असते परंतु तो अखेरचा निर्णायक पुरावा नसतो.
 • कलम 32 – ज्या व्यक्तींना साक्षीदार म्हणून बोलावणे शक्य असते (मृत व्यक्ती, हरवलेली व्यक्ती इ.) अशा व्यक्तींचे जबाब ग्राह्य/लागू होतात.
 • कलम 32 (1) – मृत्यू पूर्व जबाब
 • कलम 45 – तज्ज्ञांची/निष्णांताची मते
  खालील 5 प्रकाराच्या व्यक्ती ह्या तज्ज्ञ साक्षीदार मानल्या जातात.
  1) हस्ताक्षर तज्ज्ञ
  2) अंगुलीमुद्रा तज्ज्ञ
  3) कोणत्याही शास्त्रीय शाखेतील तज्ज्ञ – डॉक्टर, इंजीनिअर
  4) परिकीय कायद्यांचा अभ्यास केलेले तज्ज्ञ
  5) कला किंवा संस्कृती यांचा अभ्यास केलेले तज्ज्ञ
 • कलम 47 – हस्ताक्षराबाबतचे मत केव्हा ग्राह्य धरले जाते.
 • कलम 53 – फौजदारी कामामध्ये चांगले पूर्व चारित्र्य ग्राह्य असते.
 • कलम 54 – फौजदारी कामामध्ये पूर्व चारित्र्य वाईट असल्याचा पुरावा सरकार पक्षाला आधीच देता येत नाही.
भारतीय पुरावा कायदा 1872च्या तोंडी पुराव्याविषयी
 • कलम 59 – तोंडी पुराव्याने गोष्ट शाबीत करणे.
 • कलम 60 –
  1) तोंडी पुरावा प्रत्यक्ष असला पाहिजे.
  2) गोष्ट डोळ्यांने पाहिले आल्यास पाहणार्‍या व्यक्तींची साक्ष.
  3) ज्या साक्षीदाराने गोष्टीचे अस्तित्व, चव, वास, स्पर्श करून पाहिले असेल त्याची साक्ष.
  4) कलम 45 प्रमाणे तज्ज्ञांचे मत हा तोंडी पुरावा असतो कारण की, हा पुरावा देतांना तज्ज्ञ साक्षीदार आधारभूत ग्रंथांचा वापर   करतात म्हणून त्यांच्या पुराव्याला प्रत्यक्ष पुरावा म्हटले जाते.
  5)काही वेळेस जप्त केलेला माल अवजड स्वरुपात असल्यामुळे विशिष्ट अधिकारी त्याचे निरीक्षण करून कोर्टात जो पुरावा देतात तो तोंडी पुरावा मानला जातो.
भारतीय पुरावा कायदा 1872च्या लेखी पुराव्याविषयी
 • कलम 61 – दस्तऐवजामधील मजकुराचा पुरावा.
 • कलम 62 – अव्वल/प्राथमिक पुरावा
 • कलम 63 – दुय्यम पुरावा
 • कलम 74 – सार्वजनिक दस्तऐवज
टीप – खाली दिलेले दस्तऐवज हे सार्वजनिक दस्तऐवज मानले जातात.
केंद्र सरकार किंवा राज्यसरकार यांनी पास केलेले कायदे.
भारत सरकार शिवाय इतर देशांनी पास केलेले कायदे आणि त्यांचे रेकॉर्ड
भारत देशातील अगर परदेशातील न्यायसंस्था अगर कायदा खाते, पोलीस खाते, महसूल खाते यांनी त्यांच्या कामकाजा करिता तयार केलेले कायदे पोटनियम वैगरे.
 • कलम 75 – खाजगी दस्तऐवज
टीप – कलम 74 मध्ये दिलेल्या खेरीज इतर सर्व दस्तऐवज हे खाजगी दस्तऐवज आहेत.
 • कलम 76 – सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणीत प्रती.
भारतीय पुरावा कायदा 1872च्या शाबितीची जबाबदारी
 • कलम 101 – शाबितीचा बोजा/जबाबदारी
 • कलम 113 अ – विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास अपप्रेरणा/चेतावणी देण्यासंदर्भात अनुमान किंवा गृहितक
 • कलम 113 ब – हुंडाबळी संबंधीचे अनुमान/गृहितक
भारतीय पुरावा कायदा 1872च्या साक्षीदारांसंबंधी
 • कलम 125 – अपराध घडल्यासंबंधीची माहिती
  कोणताही दंडाधिकारी/पोलीस अधिकारी/महसूल अधिकारी यांना सार्वजनिक हितसंबंधांविरुद्ध कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची त्यांच्यावर सक्ती/बंधन केली जाणार नाही.
टीप – महसूल अधिकारी या व्याख्येत आयकर अधिकारी, पोस्ट ऑफिस अधिकारी, वन अधिकारी, एक्साईज अधिकारी इत्यादींचा समावेश होतो.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.