अनुसूचित जाती व जमाती कायदा : 1989 (भाग 2) विषयी संपूर्ण माहिती

Anusuchit Jati Jamati Kayada 1989 Bhag-2

अनुसूचित जाती व जमाती कायदा : 1989 (भाग 2)

भाग 3

10) दहावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • घटनेतील कलम क्रमांक 244 नुसार वरील कृत्य करणार्‍या व्यक्तीस त्या परिसरातून हद्दपार करण्याचा अधिकार विशेष न्यायालयाला आहे.
 • अशा प्रकारच्या व्यक्तीच्या विरोधी आदेश काढल्यास त्यावर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे. त्या आदेशाच्या विरोधी 30 दिवसांच्या आत ती व्यक्ती दाद मागू शकते.

11) अकरावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • जर हद्दपार व्यक्तीने न्यायालयाचा आदेश म्हणून बंदी असलेल्या भागात प्रवेश केल्यास त्याला अटक करून कैदेत टाकता येते.
 • कलम क्रमांक 10 नुसार एखाद्याने विनंती केल्यास तात्पुरत्या काळासाठी त्या भागात येण्यास परवानगी दिली जाते.
 • विशेष न्यायालय अशी परवानगी कोणत्याही क्षणी रद्द करू शकते.
 • जर त्या व्यक्तीने कलम 10 मधील तरतुदींचा भंग करून त्याने नवीन परवानगी न मागता त्या भागात परतला तर त्यास अटक करून कैद होऊ शकते .

12) बारावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • ज्या व्यक्तिविरुद्ध कलम 10 नुसार आज्ञा देण्यात आलेल्या आहेत त्याच्याविषयी पूर्ण माहिती व फोटो पोलिस अधिकारी घेऊ शकतात.
 • जर अशा व्यक्तीने या गोष्टी करण्यास नकार दिला तर त्याविरुद्ध पोलीस सर्व प्रकारचे उपाय करू शकतात.
 • भारतीय दंडविधांनातील कलम क्रमांक 186 नुसार अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते.
 • अशा व्यक्तीची शिक्षा रद्द झाल्यास त्या व्यक्तीची माहिती व फोटो परत द्यावा लागतो.

13) तेरावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • कलम क्रमांक 10 नुसार केलेली आज्ञा न पाळल्यास त्या व्यक्तिला जास्तीत जास्त 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
भाग 4 : विशेष न्यायालयाची स्थापना

विशेष न्यायालयाची स्थापना :

14) चौदावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने प्रत्येक जिल्ह्यात वरील प्रकारच्या सुनावण्या निकाली काढण्यासाठी विशेषा न्यायालय स्थापन करू शकते.

15) पंधरावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • या प्रकारच्या न्यायालयात राज्य सरकार 7 वर्षांपेक्षा जास्त वकिलीचा अनुभव असणार्‍या व्यक्तीस जनअभिकर्ता म्हणून नेमणूक करतात.
भाग 5

16) सोळावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • कलम 10 अ नुसार नागरी संरक्षण कायद्यात येणार्‍या गोष्टी शिक्षेसाठी वापरल्या जाऊ शकतात.

17) सतरावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश किंवा पोलीस उपअधीक्षक यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी एखाद्या भागास अत्याचारी भाग म्हणून घोषित करू शकतो.

18) आठरावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • कलम क्रमांक 438 मधील तरतुदी या व्यक्तींना लागू नसतील .

19) एकोणाविसवा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • तसेच कलम क्रमांक 360 मधील तरतुदी या गुन्ह्यातील सामील व्यक्तीसाठी लागू नसतील.

20) विसावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • कायद्याची पायमल्ली करणारी कृती

21) एकविसावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे सरकारचे कर्तव्ये

22) बाविसावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • या कायद्यानुसार सद्धेतू ठेवून केलेल्या कृतीला संरक्षण देण्यात येईल.

23) तेविसावा उल्लंघन खालीलप्रमाणे :

 • केंद्र शासन अधिसूचनेव्दारे राजपत्रित आदेशात या कायद्यासाठी नियम बनवू शकते.
You might also like
2 Comments
 1. Sadanand Londhe says

  needy the help is has act
  super

 2. Ravi says

  Help is has Supr it..

Leave A Reply

Your email address will not be published.