मानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2) विषयी संपूर्ण माहिती

Types Of Human Rights And Rules Part-2

मानवी हक्काचे प्रकार आणि कलम (भाग-2)

ब. नागरी व राजकीय हक्कांची अंतरराष्ट्रीय सनद – 1966 :

  • कलाम 1 – सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करणे.
  • कलाम 2 – व्दारा मंजुरी देणार्‍या राष्ट्रांनी या जाहीरनाम्यातील हक्कांची कायदेशीर हमी घ्यावी अशी तरतूद केली आहे.
  • कलम 3 – सर्वांना समान वर्तणूक व भेदभावरहित वर्तवणुकीची हमी देणे.
  • कलम 4 – व्दारा विशेष परिस्थितीत राष्ट्रे-राज्ये व्यक्तीच्या नागरी व राजकीय हक्कांवर रास्ते निर्बंध घालू शकतात अशी तरतूद आहे.
1966 च्या जाहीरनाम्यात पुढील हक्क नमूद केले आहेत.
  • कलम 6 – जीविताचा हक्क
  • कलम 7 – छळ अथवा क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वागणूक वा शिक्षेविरूद्धचा अधिकार
  • कलम 8 – गुलामगिरी अथवा सक्तीच्या कामाविरूद्धचा अधिकार
  • कलम 9 – स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत सुरक्षेचा हक्क, मनमानी अटक व स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क
  • कलम 10 – आरोपीस मानवी व प्रतिष्ठापूर्वक वागवण्याचा अधिकार
  • कलम 11 – एखादा करार पाळता येत नाही म्हणून तुरुंगवास केला जावू नये.
  • कलम 12 – कोठेही संचार व वास्तव्याचे स्वातंत्र्य
  • कलम 14, 15 – न्यायालय व लवादापुढे समानतेचा अधिकार, आरोपींचे अधिकार
  • कलम 16 – कायद्याने व्यक्ती म्हणून मान्यता देण्याचा अधिकार
  • कलम 17 – गुप्ततेचा अधिकार
  • कलम 18 – विचार, विवेक व धर्माचा हक्क
  • कलम 19 – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
  • कलम 21 – शांततामय मार्गाने सभा भरविणे
  • कलम 22 – संघटना स्वातंत्र्य
  • कलम 23 – कुटुंबाचा अधिकार
  • कलम 24 – बालकांचे हक्क
  • कलम 25 – राजकीय सहभागाचा समान हक्क
  • कलम 26 – कायद्यामुळे समानता व कायद्याचे समान संरक्षण
  • कलम 27 – स्वतःची संस्कृती, धर्म व भाषा यांचा विनियोग करणे व त्यांचे संवर्धन करण्याचा अल्पसंख्यांकांचा अधिकार

क. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद – 1966

23 मार्च 1976 रोजी या सनदेची प्रत्यक्ष अंमलबाजावणी सुरू झाली.
  • कलम 6 – कामाचा हक्क
  • कलम 7 – कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल वातावरण
  • कलम 8 – कामगार संघटना स्थापने व सदस्यत्व स्वीकारणे
  • कलम 9 – सामाजिक सुरक्षितेचा हक्क
  • कलम 10 – कुटुंब, माता व बालकांचे हक्क
  • कलम 11 – योग्य जीवनमानाचा अधिकार
  • कलम 12 – शारीरिक व मानसिक आरोग्याचा उच्चतम दर्जा गाठण्याचा अधिकार
  • कलम 13, 14 – शिक्षणाचा हक्क
  • कलम 15 – सांस्कृतिक जीवनात सहभाग घेण्याचा अधिकार
You might also like
4 Comments
  1. sapna says

    how can i get the pdf of particular subject or topic.?

  2. Salim says

    Salim Tadavi

  3. Salim says

    Good

  4. Uddhav Dole says

    Respected sir/mam I completed bsc nursing
    Graduation complete I have doubt related to CDPO POST Eligibility criteria graduation not realted to medical and Engineering but my profession is health Science or para medical so can I eligible or not please reply me Mam

Leave A Reply

Your email address will not be published.