बेटी बचओ, बेटी पढाओ योजना
बेटी बचओ, बेटी पढाओ योजना
- 22 जानेवारी, 2015 रोजी हरियाणा राज्यातील ‘पानिपत’ या जिलयामध्ये ‘बेटी बचओ, बेटी पढाओ योजना’ या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- लिंगगुणोत्तरात देशातील सर्व राज्याच्या क्रमवारीत हरियाणा राज्याचा क्रम सर्वात खालचा लागतो, या पाश्र्व्भुमीवर देशाचे पंतप्रधान तुमच्याकडे हात पसरून उभा आहे आणि देशातील मुलीच्या दिर्घायुषाची भीक मागतो आहे असे भावनात्मक आव्हान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्त्रिभृण’ हत्या करणार नाही आणि ‘स्त्री-पुरुष’ भेदभावही करणार नाही,अशी शपथ दिली. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मध्यप्रदेशच्या ‘लादली लक्ष्मी’ योजनेच्या सदिच्छा दूत माधुरी दिक्षित उपस्थित होत्या.
- ही योजना प्राथमिक तत्वावर देशातील 100 जिलयामध्ये लागू करण्यात येत आहे.
- 10 वर्षाखालील मुलीसाठी अधिक व्याजदर असण्यार्या तसेच आयकरात सवलत असण्यार्या बँक खात्या संदर्भातील ‘सुकन्या समृद्धि’ योजनेचे औपचारिक उदघाटनही नरेंद्र मोदी यांनी केले.
- ‘देशातील द हजारी मुलांमगे मुलीच्या जननसंख्येत वाढ व्हावी हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.’