9 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

रतन टाटां
रतन टाटां

9 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2022)

रतन टाटांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर :

 • टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
 • रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
 • या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त दिलं आहे.
 • एकूण 24 व्यक्ती आणि संस्थांना समाज कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हवाई दलासाठी शस्त्रप्रणाली शाखेस केंद्राची मंजुरी :

 • केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी शस्त्र प्रणाली शाखा स्थापण्यास मान्यता दिली आहे.
 • स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय हवाई दलात नवीन शाखा तयार करण्यात येत आहे.
 • या शाखेच्या स्थापनेमुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात करून हवाई दलाची 3,400 कोटींहून अधिक रकमेची बचत होईलअशी माहिती हवाई दल प्रमुख एअर
 • चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी शनिवारी दिली. भारतीय हवाई दलाने पुढील वर्षांपासून महिला ‘अग्निवीर’ची भरती करण्याची योजना आखली आहे.
 • कोणतेही एक सशस्त्र दल स्वबळावर लढाई जिंकू शकत नाही, म्हणून तिन्ही दलांमधील समन्वय वाढवण्यासाठी काम सुरू आहे.

दिनविशेष:

 • 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
 • बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
 • ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
 • युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.