9 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन:
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

9 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2020)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन:

 • केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते 74 वर्षांचे होते.
 • बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
 • अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं.
 • दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची बिहार आणि देशाच्या राजकारणात छाप राहिली.
 • दोन वेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2020)

फोर्ब्सची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर:

 • फोर्ब्सने सन 2020ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत.
 • तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग 13व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
 • फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग 13 वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
 • नुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली.

अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर:

 • अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना 2020 चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 • त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.
 • त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन 1992 मध्ये प्रकाशित झाला होता.
 • या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.

IRS अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्टचे प्रशिक्षण:

 • रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो या भारताच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहेत. ‘रॉ’ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची तर आयबी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.
 • राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही संस्था सध्या इन्कम टॅक्स, अमलबजावणी संचलनालय म्हणजे इडी, महसूल गुप्तचर संचलनालय आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’चे प्रशिक्षण देत आहे.
 • ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’ म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करुन, आधुनिक पद्धतीने हेरगिरी करण्याचे तंत्र आणि पद्धत.
 • गुप्त पद्धतीने माहिती गोळा करणे तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हाताळण्यात आयआरएस अधिकाऱ्यांना पारंगत करण्यासाठी खास नऊ कोर्सेसचे मॉड्युल बनवण्यात आले आहे.
 • भारतीय महसूल सेवेतील फक्त ग्रुप ए च्या अधिकाऱ्यांना रॉ च्या गुरगावमधील प्रशिक्षण केंद्रात तर आयबीच्या दिल्लीतील राष्ट्रीय गुप्तचर केंद्रात प्रशिक्षण दिले जाते.
 • या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाचे CEIB समन्वयक म्हणून काम पाहते.

फ्रान्सचा 7-1 ने विजय:

 • आघाडीवीर ऑलिव्हियर गिरौडने आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल झळकावल्यामुळे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत युक्रेनसारख्या बलाढय़ संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला.
 • युवा खेळाडू एडवाडरे कॅमाविंगा याने नवव्या मिनिटालाच फ्रान्सचे खाते खोलल्यानंतर गिरौडने 24व्या आणि 33व्या मिनिटाला गोल लगावत फ्रान्सला 3-0 असे आघाडीवर आणले होते.
 • विताली मायकोलेंको याच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने पहिल्या सत्रात 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
 • फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी दुसऱ्या सत्रात किलियन एम्बाप्पे आणि विक्टर सायगानकोव्ह यांना संधी दिली.
 • त्यानंतर कोरेन्टिन टोलिस्सो, एम्बाप्पे आणि अँटोनी ग्रिएझमान यांनी गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिनविशेष:

 • 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
 • बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
 • ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
 • युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.