9 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
9 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 मे 2022)
जॉन ली यांची हाँगकाँगच्या नेतेपदी निवड :
- हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे कट्टरवादी सुरक्षा प्रमुख जॉन ली यांची रविवारी प्रामुख्याने चीनधार्जिण्या समितीने केलेल्या मतदानात शहराचा यापुढील नेता म्हणून निवड करण्यात आली.
- तर या निवडणुकीतील एकमेव उमेदवार असलेल्या ली यांनी झालेल्या मतदानापैकी 99 टक्क्यांहून अधिक मते मिळवून ही निवडणूक जिंकली.
- मतदार असलेल्या सर्व, म्हणजे 1500 समिती सदस्यांची बीजिंगमधील मध्यवर्ती सरकारने काळजीपूर्वक छाननी केली होती.
- ली हे 1 जुलै रोजी सध्याच्या नेत्या कॅरी लाम यांची जागा घेतील.
Must Read (नक्की वाचा):
अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा आदेश :
- उपासमार आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांसाठी नवा आदेश जारी केला आहे.
- अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- एवढंच नाही तर या बुरख्यातून महिलांचे डोळेही दिसता कामा नये, असे आदेशात म्हटले आहे.
- कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर लादण्यात आलेल्या नियमांपैकी हा सर्वात कठोर नियम आहे.
- तर काही दिवसांपूर्वीच तालिबानने महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे.
महिला ‘आयपीएल’ची घोषणा :
- भारताने 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली.
- त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला.
- तसेच गेली काही वर्षे प्रायोगिक स्तरावर महिला ट्वेन्टी-20 चॅलेंज स्पर्धा घेणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिला ‘आयपीएल’ची घोषणा केली आहे.
- तर यात सहा-सात संघ अपेक्षित आहेत.
चेल्सी क्लबची मालकी लॉस एंजेलिस डॉजर्सकडे :
- प्रीमियर लीग फुटबॉलमधील चेल्सी क्लबची मालकी तीन अब्ज डॉलर रकमेला लॉस एंजेलिस डॉजर्सने मिळवली आहे.
- तर टॉड बोएहली हे या कंपनीचे भागधारक आहेत.
- युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाच्या रोमन अब्रामोव्हिच यांच्या निर्बंध लादण्यात आल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव क्लबची मालकी सोडावी लागली.
- ‘फिफा’ क्लब विश्वचषक विजेत्या आणि 2021 मधील युरोपियन विजेत्या संघाची विक्री 2.5 अब्ज पौंडला करण्यात आली आहे.
- तर जागतिक संघविक्रीमधील हा विक्रमी आकडा मानला जातो.
- प्रीमियर लीगने चेल्सीच्या नव्या मालकी कराराला मंजुरी देण्याची आणि सरकारने त्यांचा व्यवसाय करार 31 मेपर्यंत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे.
साऊंड रनिंग अॅथलेटिक्स स्पर्धात अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम :
- भारताचा आघाडीचा धावपटू अविनाश साबळेने कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सुरू असलेल्या साऊंड रनिंग अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
- 3000 मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या साबळेने या शर्यतीत 13 मिनिटे आणि 25.65 सेकंद वेळेची नोंद केली.
- परंतु त्याला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- साबळे अमेरिकेच्या यूजीनमध्ये 15 ते 24 जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील साबळेने बहादूर प्रसाद यांचा 13 मिनिटे, 29.70 सेकंदांचा विक्रम
- तर हा विक्रम त्यांनी 1992 मध्ये बर्मिगहॅम येथे नोंदवला होता.
दिनविशेष :
- मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम 9 मे 1874 मध्ये सुरू झाल्या.
- 9 मे 1936 मध्ये इटलीने इथिओपिया देश बळकावला.
- पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे 9 मे 1955 मध्ये प्रवेश.
- मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा 9 मे 1540 मध्ये जन्म.