9 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 May 2019 Current Affairs In Marathi

9 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 मे 2019)

जगजित पोवाडीया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी फेरनिवड :

  • भारताच्या जगजित पोवाडीया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या (INCB) सदस्यपदी फेरनिवड झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या मतदानाच्या पहिल्या फेरीत पोवाडीया यांना 44 मते मिळाली.
    तसेच जगजित पोवाडीया 2015 सालापासून इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या (INCB) सदस्यपदी कार्यरत आहेत.
  • तसेच यावेळी पुन्हा पाच वर्षांसाठी त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2020
    साली पूर्ण होणार असून त्या पुन्हा 2020 ते 2025 या कालावधीसाठी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मे 2019)

‘स्पेक्ट्रम ऑफ द सीज’ मुंबईकरांच्या सेवेत :

  • मुंबई व देशातील पर्यटकांचा कल समुद्री पर्यटनाकडे वाढत असल्याने नवनवीन क्रुझची सेवा सुरू होत आहे.
  • तर याच पार्श्वभूमीवर तब्बल 5 हजार 622 प्रवाशांना एकाच वेळी समुद्री पर्यटनाला घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या टायरन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम ऑफ द सीज’ या जहाजाची सेवा मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल.
  • तसेच रॉयल कॅरेबियन समूहाची ही क्रुझ क्वॉन्टम अल्ट्रा दर्जाची आहे.
  • स्पेक्ट्रम ऑफ द सीज हे भारतात आलेले आतापर्यंतचे सर्वांत मोठे जहाज आहे. या जहाजाच्या माध्यमातून भारतीय प्रवाशांना आशियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणी समुद्रमार्गे जाण्याची संधी उपलब्ध होईल.
  • तर या जहाजाची लांबी 1139 फूट आहे. ही लांबी आशियातील सध्याच्या मोठ्या जहाजापेक्षा जास्त आहे.
  • या जहाजामध्ये स्काय पॅड, व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी अशा विविध सुविधा आहेत. अल्टिमेट फॅमिली सूट सुविधा असून इन-रूम स्लाईड नावीन्यपूर्ण डायनिंग संकल्पना आहे.
  • जगभरातील खाद्यपदार्थ या जहाजावर उपलब्ध असतील. याशिवाय तीन मजली मुख्य डायनिंग रूम असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि आशियाई अला कार्ट पर्याय, सेलिब्रिटी शेफ जेमी ऑलिव्हरद्वारा जेमीज इटालियन इझुमी जपानी कुझीन, अस्सल सिचुआन पदार्थ पुरवणारे सिचुआन रेड हे नवीन स्पेशालिटी रेस्टॉरंट आणि लीफ अँड बीन ही पारंपरिक टी रूम आणि कॅफे पार्लर देखील येथे उपलब्ध आहेत.

राजू नायक यांच्या पुस्तकांचे पणजीत प्रकाशन :

  • लोकमतचे संपादक राजू नायक यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी 11 रोजी येथील मॅकिनीझ पॅलेस सभागृहात सायं. साडेपाचला होणार आहे.
  • या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यासोबत लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आणि चित्रकार सुभाष अवचट उपस्थित राहणार आहेत.
  • ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ ही तीन पुस्तके प्रकाशित होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड :

  • आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत.
  • तर अशा शिखर संस्थेला जगातल्या 86 देशांतून आलेल्या 4320 शोध निबंधातून इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशन संस्थेमधील आठ संशोधकांनी सादर केलेल्या दोन संशोधनास मान्यता मिळून त्यांचे सादरीकरण करण्यास ऑक्टोबर
    2019 मध्ये एसीने आमंत्रण दिले आहे.
  • तसेच या आठ तरुणांपैकी सात हे रायगड जिल्ह्यातील असून एक कल्याणमधील आहे.
  • जगभरातील विविध संशोधक, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एसी समोर त्यांचे शोधनिबंध सादर करतील, त्यात आपल्या ग्रामीण भागातील हे तरुण संशोधक प्रथमच एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून, आपले संशोधन जगातल्या सर्वोच्च अवकाशीय शिखर परिषद समोर आपले म्हणणे मांडतील.

दिनविशेष :

  • मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम 9 मे 1874 मध्ये सुरू झाल्या.
  • 9 मे 1936 मध्ये इटलीने इथिओपिया देश बळकावला.
  • पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे 9 मे 1955 मध्ये प्रवेश.
  • मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा 9 मे 1540 मध्ये जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.