9 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
9 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जून 2022)
‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय मुलीचे यश :
- अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय हरिणी लोगन या भारतीय वंशाच्या मुलीने कडव्या लढतीनंतर यंदाची ‘स्क्रिप्स स्पेिलग बी’ स्पर्धा जिंकली.
- पहिल्यांदाच स्पर्धेचा निकाल 90 सेकंदांच्या ‘स्पेल ऑफ’(टायब्रेकरद्वारे) लागला.
- ज्यामध्ये 26 पैकी 22 शब्दांची योग्य स्पेलिंग अचूक सांगत तिने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला.
- 2 जूनला घेण्यात आलेल्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत अमेरिकेसह जगभरातील 234 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
- ही स्पर्धा जिंकण्यासाठी अखेरीस आठवीत शिकणाऱ्या हरिणी हिने ‘मुरहेन’ या शब्दाची स्पेलिंग सांगितली. एका सुंदर लहान पक्ष्याचे हे नाव आहे.
- विशेष म्हणजे या स्पर्धेतील दोन्ही अंतिम स्पर्धक हे भारतीय मूळ वंशाचे होते. उपविजेता विक्रम राजू हासुद्धा भारतीय वंशाचा आहे.
- ‘स्क्रिप्स स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्या हरिणी हिला 50 हजार डॉलर बक्षीस म्हणून देण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय :
- मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे.
- एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे.
- त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.
- यावेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
आरबीआयची व्याजदरांत वाढ :
- महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
- रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.
- यासोबत रेपो रेट 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
- एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.
- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.
स्थलांतरित मतदार कुठूनही मतदान करू शकणार :
- स्थलांतरित मतदारांचा सहभाग सुधारण्यासाठी आणि शहरी तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगसाठी मंगळवारी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- निवडणूक आयोगाने म्हटले आहे की स्थलांतरित मतदारांच्या समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती राजकीय पक्षांचा सल्ला देखील घेईल.
- विशेष म्हणजे निवडणूक आयोग गेल्या काही वर्षांपासून रिमोट वोटिंगसाठीच्या संकल्पनेवर विचार करत आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिमोट मतदान सुरू करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या लोकसंख्येचे मॅपिंग सुरू करण्याची योजना आखली आहे.
- स्थलांतरित मतदारांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.
- निवडणूक आयोगाच्या बैठकीत अवघड भागात ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अतिरिक्त उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मितालीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
- मितालीने 232 एकदिवसीय सामन्यांत 7,805 धावा केल्या आहेत.
- याचप्रमाणे एकूण 10,868 धावांसह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकंदर धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
- तिने 89 ट्वेन्टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले, तर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिला केवळ 12 कसोटी सामने खेळायला मिळाले.
- क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात द्विशतक झळकावणारी ती भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
- मितालीने 2019 मध्येच ट्वेन्टी-20 प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
- मितालीने सहा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राला 10 पदके :
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण 10 पदके मिळवली.
- कुस्ती, ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलििफ्टगमधील पदकांचा यात समावेश आहे.
- हरयाणाने बुधवारी 87 पदकांसह अव्वल स्थान गाठले असून, महाराष्ट्र 73 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
दिनविशेष :
- अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.
- एडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
- भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.