9 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 डिसेंबर 2018)

9 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 डिसेंबर 2018)

चंद्राचा वेध घेण्यासाठी चीनचे यान झेपावले :

  • चीनचे चांद्रयान यशस्वीरीत्या झेपावले असून ते चंद्राच्या आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या भागात उतरणार आहे. अवकाश क्षेत्रात महाशक्ती होण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असून त्या दिशेने हे पाऊल आहे.
  • चेंज 4 हे चांद्र शोधक यान असून मार्च 3 बी प्रक्षेपकाच्या मदतीने ते नैर्ऋत्य चीनमधील शिचांग प्रक्षेपण केंद्रावरून मार्गस्थ झाले.
  • तसेच नवीन वर्षांत हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता असून त्याच्या मदतीने तेथे अनेक प्रयोग केले जाणार आहेत.
  • तर चंद्राच्या अद्याप अभ्यासल्या न गेलेल्या भागात चीनचे बग्गीसारखी रोव्हर गाडी असलेले हे यान उतरणार असून चंद्राची एक बाजू कधीच पृथ्वीला सामोरी येत नाही त्या अंधाऱ्या बाजूकडील भागात हे यान उतरणार असून 1959 मध्ये सोविएत युनियनने त्याच्या पहिल्या प्रतिमा घेतल्या होत्या. या भागात यान उतरवणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे.
  • चेंज 4 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एटकन खोऱ्यात उतरणार आहे. यात चीनचे सहा तर इतर देशांचे चार प्रयोग समाविष्ट आहेत.
  • तसेच चंद्रावरील रात्र पृथ्वीवरील 14 दिवसांसमान असते. त्या वेळी तेथील तापमान उणे 173 अंश सेल्सियस असते.
  • तर तेथील दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांसमान असतो, तेव्हा तापमान 127 अंश सेल्सियस असते.

मेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डे लियॉन ठरली मिस वर्ल्ड 2018 :

  • मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डे लियॉन या वर्षीचा मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. मागील वर्षीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने व्हेनेसाच्या डोक्यावर क्राऊन घातला. तर चीनच्या सान्या या शहरामध्ये ही स्पर्धा रंगली होती.
  • व्हेनेसा पोन्स डे लियॉन ही 68 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेतली विजेती स्पर्धक ठरली आहे. तर थायलँडची निकोलेन पिशापा ही फर्स्ट रनर अप ठरली आहे.
  • तसेच या स्पर्धेत भारतातर्फे तामिळनाडूच्या अनुकृती वासनेही सहभाग घेतला होता. ती टॉप 30 मध्येही पोहचली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2018)

अवयवदानाच्या इच्छेची ड्रायव्हींग लायसन्सवर होणार नोंद :

  • अवयवदानासाठी मागील अनेक दिवसांपासून शासनाच्या आरोग्य विभागाकडूनही जनजागृती करण्यात येणार आहे.
  • तर रस्त्यांवर होणारे अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू यांचेही प्रमाण भारतात जास्त आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेतला जाणार आहे.
  • अवयवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर या गोष्टीची नोंद यापुढे होणार आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
  • तसेच रस्ते अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सहा तासांच्या आत अवयवदान करता यावे याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी व्यक्तीच्या लायसन्सवर त्याची इच्छा असल्याची नोंद असणे आवश्यक आहे.

विराटने मिळवले सचिन, द्रविडच्या पंगतीत स्थान :

  • पहिल्या डावात विराट 3 धावांवर बाद झाला होता. या मैदानावर एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर प्रथमच ओढवली होती. पण दुसऱ्या डावात त्याने अत्यंत संयमीओ सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियातील आपल्या 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. कोहलीने केवळ 9 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली.
  • ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 20 कसोटीत 1809 धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर व्ही व्ही एस लक्ष्मण असून त्याने 15 सामन्यात 1236 धाव केल्या. तर राहुल द्रविडने 15 कसोटीत 1166 धावा केल्या. या यादीत आता कोहलीनेही स्थान मिळवले आहे.

क्युबामध्ये उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट :

  • अमेरिकेसारख्य़ा महासत्तेला अनेक दशके कडवी टक्कर देणाऱ्या कॅरेबियन बेटांवरील छोटासा देश क्युबामध्ये नुकतीच सार्वजनिक इंटरनेट सुविधा सुरु झाली.
  • तसेच या देशातील नागरिक अनेक वर्षे इंटरनेटपासून दूर होते. या देशात आधीही इंटरनेट होते. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. इंटरनेट सेवा नसणारा हा जगातील शेवटचा देश होता.
  • तर क्युबामध्ये थ्रीजी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली असून टेलिकॉम कंपनी ETECSA ही सेवा देत आहे. या कंपनीने इंटरनेटचा प्लॅनही जाहीर केला असून नागरिकांना प्रती महिन्यासाठी 30 डॉलर म्हणजेच 2100 रुपये भरावे
    लागणार आहेत. यामध्ये केवळ 4 जीबी डेटा मिळणार आहे.
  • क्युबामध्ये याआधीही इंटरनेट सुविधा मिळत होती. मात्र, त्याचा वापर सर्वच करू शकत नव्हते. 2013 पर्यंत इंटरनेट केवळ महागड्या हॉटेलांमध्येच मिळत होते. कारण पर्यटक त्याचा वापर करू शकतील. यानंतर 2017 मध्ये देशभरात
    वाय-फाय आणि इंटरनेट कॅफे सुरु करण्यात आले. सध्या क्युबामध्ये 1200 वायफाय हॉटस्पॉट आहेत ज्याचा वापर 20 लाख लोकच करतात.

दिनविशेष :

  • 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
  • 9 डिसेंबर 1892 मध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
  • डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची 9 डिसेंबर 1900 मध्ये सुरवात.
  • 9 डिसेंबर 1946 मध्ये दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
  • ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म 9 डिसेंबर 1961 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.