9 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
9 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2022)
भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम :
- समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ही मोहीम सुरू केली आहे.
- तज्ज्ञांची टीम समुद्रात पाठवून संशोधन करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
- या मोहिमेंतर्गत तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात 6 हजार मीटर खाली पाठवण्यात येईल.
- यासाठी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या ‘मत्य 6000’ ( MATSYA 6000 Deep Submergence Vehicle ) या समुद्रात खोलवर जाऊन खनिजांचा शोध घेणाऱ्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे.
- पृथ्वीचा 70 टक्के भाग पाण्याने महासागराने व्यापला आहे. या महासागरांचा फक्त पाच टक्के भागात आतापर्यंत संशोधन करण्यात आले आहे.
- ‘मत्स्य 6000’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह खनिजांचा शोध घेणारे मानवयुक्त वाहन आहे.
- यापूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने (NIOT) रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स (ROV) आणि ऑटोनॉमस कोरिंग सिस्टम (ACS) सारखा विविधा उपकरणांचा वापर समुद्राखालील संशोधनासाठी केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये भागीदारीचा सरकारचा निर्णय :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या मुंबई- अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पात (बुलेट ट्रेन) 25 टक्के भागीदार होण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.
- त्यानुसार या प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. या विशेष कंपनीमध्ये (एसपीव्ही) सरकार पाच हजार कोटींची गुंतवणूक करम्णार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा कोटींचा निधी गुंतविण्यात आला आहे.
- सुमारे 508 किमी लांबीचा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई- अहमदाबाद मार्गावर राबविण्यात येत आहे.
- यातील 155 किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्रात असून वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे.
- एक लाख कोटीहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. ही विशेष उपयोजिता वाहन कंपनी स्थापन करण्यात आली असून त्यात केंद्र सरकार 50 टक्के म्हणजेच 10 हजार कोटींची गंतवणूक करणार आहे.
राष्ट्रकुलमध्ये 61 पदकांसह भारत चौथ्या स्थानी :
- भारताने बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 61 पदकांची कमाई केली.
- त्यामुळे भारताला या स्पर्धेत चौथे स्थान पटकावण्यात यश आले.
- भारताने यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असली, तरी त्यांना गोल्ड कोस्ट येथे 2018 मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेतील पदकसंख्या ओलांडता आली नाही.
- भारताने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात सिंधू, लक्ष्यची सुवर्णकमाई :
- भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुलच्या बॅडिमटन प्रकारात अपेक्षित कामगिरी करताना सोमवारी सुवर्णपदकांची कमाई केली.
- एकेरीतील या यशापाठोपाठ चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीने पुरुष दुहेरीतही सोनेरी यश मिळवले.
- एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच निर्भेळ यश मिळविले.
- भारताने वैयक्तिक प्रकारात तीन सुवर्ण, दोन कांस्य, तर सांघिक गटात रौप्य अशी एकूण सहा पदके पटकावली.
- सिंधूने आपल्या पदकांच्या यादीत राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचा समावेश करताना कॅनडाच्या मिशेल लीवर सहज मात केली.
- लक्ष्यने एन्ग त्झे योंगचा कडवा प्रतिकार एका गेमच्या पिछाडीनंतर परतवून लावला.
भारतीय हॉकी संघाला रौप्य पदक :
- भारतीय हॉकी संघाने रौप्य पदक पटकावले आहे.
- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-0 अशा फरकाने पराभव केला.
- पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.
- सामन्यात सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी कॉर्नर उधळण्यात भारतीय बचावपटूंना यश आले.
अचंताचा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक :
- भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने पुरुष एकेरीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
- अचंताने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव केला.
- अचंताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे चौथे पदक ठरले आहे.
- पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे.
- याशिवाय, श्रीजा अकुलासोबत त्याने मिश्र दुहेरीचेही सुवर्ण पदक पटकावलेले आहे.
दिनविशेष :
- 9 ऑगस्ट हा ‘भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन‘ आहे.
- सन 1942 मध्ये 9 ऑगस्ट रोजी (क्रांतिदिन) भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
- छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन 9 ऑगस्ट 1993 मध्ये झाले.
- सन 2000 मध्ये भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.