8 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतासाठीच्या पहिल्या राफेल विमानाच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू :

 • भारतीय हवाईदलाला पुरवण्यासाठीचे पहिले राफेल विमान तयार झाले असून त्याच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू आहेत.
 • मात्र भारताने सुचवलेल्या सर्व प्रकारच्या सुधारणा केलेले राफेल विमान एप्रिल 2022 मध्ये, म्हणजे कराराची मुदत
  संपल्यानंतर मिळणार आहे.
 • भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारानुसार त्यात 13 प्रकारचे खास भारतासाठीचे बदल (इंडिया-स्पेसिफिक एन्हान्समेंट्स) करण्यात येणार आहेत.
 • तसेच त्यात रडारची क्षमता वाढवणे, वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यांसंबंधी माहिती दिसणे, टोड डेकॉय यंत्रणा, लो बँड जॅमर, रेडिओ अल्टिमीटर आणि अतिउंच वातावरणात विमान वापरता येण्याची क्षमता आदी बाबींचा समावेश
  आहे. या सोयी मूळ फ्रेंच विमानात नाहीत.
 • राफेल विमानावर हे बदल कार्यान्वित करून त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यास करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 67 महिन्यांचा कालावधी (म्हणजे एप्रिल 2022 पर्यंतचा काळ) लागणार आहे.
 • तर सध्या भारतासाठीचे पहिले विमान तयार झाले असून त्यावर हे बदल करून त्यांच्या चाचण्या घेण्यास फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे.
 • त्यावर देखरेख करण्यासाठी भारतीय हवाईदलाच्या 4 अधिकाऱ्यांचे पथक ऑगस्ट 2017 पासून फ्रान्समध्ये दाखल झाले आहे.

उत्साही देशांच्या यादीत भारताचा 117 वा क्रमांक :

 • कोणता देश सर्वात जास्त उत्साही आणि कार्यक्षम आहे आणि कोणता देश सर्वात आळशी आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने 167 देशांमध्ये पाहणी करून वर्गवारी केली आहे.
 • सर्वात जास्त कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा देशाने पहिले स्थान पटकावले आहे तर यादीत तळाला म्हणजे सर्वात आळशी या स्थानावर कुवेत देश आहे.
 • उत्साहीपणाच्या निकषामध्ये 167 देशांमध्ये भारत 117 व्या स्थानावर आहे.
 • उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका 143व्या स्थानावर, इंग्लंड 123व्या स्थानावर, सिंगापूर 126व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया 97व्या स्थानावर आहे.
 • तसेच कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया आणि इराकमधील निम्म्याहून जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
 • तर युगांडामधील केवळ 5.5 टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाही आहे.

इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधन वाहनांसाठी लवकरच नवे धोरण :

 • इलेक्ट्रिक आणि वैकल्पिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवे धोरण आणण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. पहिल्या जागतीक ग्लोबल मोबिलिटी
  समिटमध्ये ते बोलत होते.
 • तर मोदी म्हणाले, हवामान बदलाविरोधातील लढाईसाठी सर्वात शक्तिशाली हत्यार ‘स्वच्छ ऊर्जा’ हे असून यावरच ‘क्लीन मोबिलिटी’ आधारित आहे. भारत जगातील तिसरा सर्वाधिक मोठा इंधन ग्राहक देश आहे.
 • तसेच ते म्हणाले, कॉमन, कनेक्टेड, कन्व्हिनिअंट, कंजेशन-फ्री, चार्ज्ड, क्लीन, कटिंग एज हे ते 7C आहेत. भारत विकसित होत आहे, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था आहे.
 • भारत इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, बॅटरीज आणि स्मार्ट चार्जिंगची उपकरणे बनवण्यासाठी गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. चांगली मोबिलिटी रोजागाराचे चांगल्या संधी, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगली जीवनशैली उपलब्ध करु शकते, असेही मोदी यावेळी म्हणाले.
 • या संमेलनात जगभरातून सुमारे 2200 भागधारक सहभागी होणार आहेत. यामध्ये सरकार, उद्योग, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
 • तसेच यामध्ये अमेरिका, जपान, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका, दक्षिण कोरिया, न्यूझिलंड, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि ब्राझील या देशांतील दुतावास तसेच खासगी क्षेत्रातील प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

भारतातून चोरीला गेलेल्या 12 व्या शतकातील मूर्ती अमेरिकेने केल्या परत :

 • भारतातून चोरीला गेलेल्या 12 व्या शतकातील मूर्ती अमेरिकेने परत केल्या आहेत.
 • तसेच यामधली एक मूर्ती लिंगोधभव मूर्ती ही 12 व्या शतकातली आहे. या मूर्तीची किंमत 2 लाख 25 हजार डॉलर इतकी आहे. ही मूर्ती तामिळनाडूतून चोरीला गेली होती.
 • तर दुसरी मूर्ती मंजुश्री देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती सोनेरी रंगाची असून तिच्या हातात तलावर आहे. मंजुश्री मूर्ती 1980 च्या दशकात बोधगया या ठिकाणाहून चोरीला गेली होती. या मूर्तीची सध्याची किंमत 2 लाख 75 हजार डॉलर
  इतकी आहे.
 • भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवाच अमेरिकेने आपल्याला परत केला आहे.
 • तसेच अमेरिकेतील दोन संग्रहालयांमध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. याआधी न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटियन म्युझियम ऑफ आर्टनेही भारतातून चोरीला गेलेल्या मूर्ती भारतीय पुरातत्त्व खात्याला परत दिल्या होत्या.

एअर रायफल नेमबाजीत भारताच्या ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक :

 • कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे.
 • 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताच्या ह्रदय हजारिकाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 • तर सांघिक प्रकारातही भारतीय महिलांनी सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एक पदक टाकलं.
 • महिलांमध्ये एलवेनिल वाल्वारियन, श्रेया अग्रवाल, मनिनी कौशिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली.

दिनविशेष :

 • 8 सप्टेंबर 2018 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
 • 8 सप्टेंबर 2018 जागतिक शारीरिक उपचार दिन.
 • 8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
 • स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने 8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
 • मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.