8 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

8 October 2018 Current Affairs In Marathi

8 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2018)

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताला पाच पदके:

  • भारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धेत दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.
  • भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
  • भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
    सुहास यथीराजने एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या बाक्री ओमारचा 21-8, 21-7 असा पराभव केला.
  • एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुहासने आक्रमक खेळ करताना सहज बाजी मारली. मात्र, दुहेरीत कुमार राज व तरुण या जोडीला आणि परतीच्या एकेरीत चिराग बरेथा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • पॉवरलिफ्टिंग प्रकारात पुरुषांच्या 49 किलो गटात लाओ प्रजासत्ताकच्या लाओपाकडी पीयाने 133 किलो वजन उचलून सुवर्ण नावावर केले. भारताच्या फर्मानने 128 किलोसह रौप्य व परमजीतने 127 किलोसह कांस्यपदक जिंकले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2018)

‘आयुष्यमान भारत’ आयोग्य योजनेचे दुसऱ्यांदा उपचार घेताना ‘आधार’सक्ती:

  • देशातील 10 कोटी गरीब व वंचित कुटुंबांना आरोग्यविम्याचा लाभा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘आयुष्यमान भारत’ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पहिल्या वेळी लाभ घेण्यासाठी ‘आधार’ सक्तीचे नसले तरी दुस-यांदा उपचार घेणा-यांना अशी सक्ती करण्यात येणार आहे. Ayushyaman Bharat
  • सरकारी योजनांचे लाभ नेमक्या लाभार्थींना पोहोचविण्यासाठी ‘आधार’चा उपयोग करणे वैध अल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर हे ठरविण्यात आले.
  • ही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या ‘नॅशनल हेल्थ एजन्सी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण म्हणाले की, योजना सुरु करताना ‘आधार’ची सक्ती नव्हती. आता असे ठरविण्यात आले की, या योजनेखाली दुसर्‍यांदा उपचार घेणार्‍यांना ‘आधार’ नंबर किंवा तो नसेल तर निदान ‘आधार’ नोंदणीचे पुरावे द्यावे लागतील.
  • तसेच भूषण म्हणाले की, पहिल्यांदा उपचार घेताना असल्यास ‘आधार’ कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासारखा ओळख पटविणारा अन्य कोणताही दस्तावेज ग्राह्य मानला जाईल. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक अरोग्यविमा योजना म्हणून गाजावाजा होत असलल्या या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर रोजी झारखंडपासून केला.

साखर कारखाने करणार थेट इथेनॉल निर्मिती:

  • उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यासाठी इथेनॉल प्रकल्प देशात वाढावेत म्हणून सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जदेखील पाच वर्षांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रात 35 ते 40 तर देशात 114 प्रकल्प सुरू होणार आहेत.
  • साखर कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून अथवा बी मोलॅसिसव्दारे थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे 600 लिटर इथेनॉल म्हणजे एक टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे.
  • मागील वर्षी साखरेची मागणी 250 लाख टन असतानाही साखरेचे उत्पादन मात्र 322 लाख टन झाले. त्यामुळे देशात अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने दर घसरले आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखान्यांना मुश्‍कील झाले. त्यावर इथेनॉल प्रकल्प हाच उत्तम पर्याय असल्याचे गृहीत धरून केंद्र सरकारने नियोजन केले आहे. सोलापुरातून सर्वाधिक नवे 11 प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सहकार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

राज्यात हुक्का बंदी कायदा लागू:

  • राज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
  • महाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुक्का पार्लरवरील बंदीचे विधेयक महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते.
  • राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आता राज्यात हुक्काबंदी लागू झाली आहे. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर हुक्काबंदीच्या मागणीने जोर पकडला आणि त्यानुसार राज्य सरकारने त्याविरोधात विधेयक मंजूर केले होते.
  • डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावर्षी एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित झाले. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत शाहु मानेला रौप्यपदक:

  • कोल्हापूरकर 16 वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे 8 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपले पदकाचे खाते खोलले आहे. नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली. Shahu Mane
  • अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचे सुवर्ण पदक हुकले. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.
  • शाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

दिनविशेष:

  • संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला.
  • इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट व्दारे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायूदलाची स्थापना झाली. तेव्हा पासून हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून पाळला जातो.
  • सन 1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
  • 11 सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सन 2001 मध्ये सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.