8 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम
इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम

8 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 नोव्हेंबर 2020)

इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम :

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून 10 सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत.
 • तर आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील.
 • इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही 51 वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि 9 इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.
 • तसेच EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.
 • अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.

भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष :

 • अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील.
 • तर दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना संधी मिळणार आहे. कमला हरीस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.
 • कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे.
 • तसेच अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे.

‘पीएजीडी’चा मोठा निर्णय जम्मू-काश्मीरमधील ‘डीडीसी’निवडणूक लढवणार :

 • ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी)च्या सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व मोठा निर्णय घेण्यात आला. पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशनने जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी सर्व स्थानिक पक्षांना सोबत घेतलं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
 • ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ चे नेते सज्जाद लोन यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, या संदर्भात जम्मूमधील अनेक राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आलेली आहे.
 • बैठकीत डीडीसी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पीएजीडीच्या मते सर्व राजकीय पक्ष मिळून डीडीसी निवडणूक लढतील. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या एकसारख्या भावना आहेत.
 • दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्य निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी 20 जिल्हा विकास परिषदांसाठी निवडणुकीची व पंचायतींच्या पोटनिवडणुकांची घोषणा केलेली आहे.
 • तर डीडीसी निवडणूक 28 नोव्हेंबर पासून 22 डिसेंबरपर्यंत आठ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यापासूनची ही मोठी राजकीय घडामोड आहे.

अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल :

 • अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) शनिवारी जाहीर केले.
 • तर देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशाप्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे. देशातील वेगाने बदलणाऱ्या समाजासोबत वाटचाल करण्याच्या अमिरातीच्या राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांचेही या बदलांमध्ये प्रतिबिंब उमटले आहे.
 • यूएई व इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने या दोन देशांमध्ये झालेल्या करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
 • तसेच कायद्यातील या सुधारणांची घोषणा ‘डब्ल्यूएएम’ या सरकारी वृत्तसंस्थेमार्फत करण्यात आली व तिचे तपशील सरकारशी संलग्न असलेल्या ‘दि नॅशनल’ या वर्तमानपत्रात जाहीर करण्यात आले.
 • 21 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री आणि मद्य बाळगणे यांसाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलांन्वये रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक आणि मद्य घरात ठेवणे यांसाठी परवाना आवश्यक होता. नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन :

 • विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पेनसिल्वेनियातील 20 निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले.
 • तर चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना 273, तर ट्रम्प यांना 214 मते पडली.

दिनविशेष :

 • 8 नोव्हेंबरजागतिक शहरीकरण दिन
 • 8 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
 • 8 नोव्हेंबर 1889 मोंटाना हे अमेरिकेचे 41 वे राज्य बनले.
 • दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध 8 नोव्हेंबर 1895 मध्ये लागला.
 • 8 नोव्हेंबर 1932 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.