8 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
8 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 जुलै 2022)
गीता गोपीनाथ यांचा IMF कडून मोठा सन्मान :
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्री म्हणून ओळख असलेल्या गीता गोपीनाथ यांच्याविषयी प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना आहे.
- तर त्यांचे अधिकृत पोर्ट्रेट IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या बाजूला लावण्यात आले आहे.
- गीता गोपीनाथ यांनी दोन फोटो ट्वीट करत त्याला ‘ब्रेकिंग द ट्रेंड’ असे कॅप्शन दिले आहे.
- तसेच माझ पोर्ट्रेट सुद्धा IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या बाजूला लावण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या रांगेत त्या एकमेव महिला आहेत. त्यामुळेच त्यांनी मी ट्रेंड ब्रेक करत आहे, असं कॅप्शन दिलं आहे.
- 50 वर्षीय गीता गोपीनाथ या 2019 ते 2022 दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री म्हणून काम बघितले होते.
- तर त्या सद्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.
Must Read (नक्की वाचा):
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अखेर पायउतार :
- तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आरूढ झाल्यापासूनच अनेक वादांत अडकल्याने सहकाऱ्यांचा रोष ओढवून घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अखेर गुरुवारी पायउतार झाल़े.
- नव्या नेतृत्वाच्या निवडीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार असल्याचे जॉन्सन यांनी राजीनाम्याची घोषणा करताना सांगितल़े
- आरोग्यमंत्री साजिद जाविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनाक यांनी मंगळवारी राजीनामे दिल्याने जॉन्सन यांची खुर्ची डळमळीत झाल्याचे स्पष्ट झाले होत़े.
- तर त्यापाठोपाठ आणखी तीन कनिष्ठ मंत्री आणि सॉलिसिटर जनरल यांनीही पदत्याग केल्यामुळे जॉन्सन हे पायउतार होतील, अशी चर्चा होती़ मात्र, काही दिवस हेकेखारी करणाऱ्या जॉन्सन यांना वाढत्या दबावामुळे पायउतार व्हावे लागल़े
भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाची टेनिसमधून निवृत्ती :
- भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधू निवृत्ती स्वीकारली आहे.
- विम्बल्डन 2022 ही आपल्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याची कल्पना तिने पूर्वीच दिलेली होती.
- त्यामुळे या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील उपांत्य फेरीचा सामना तिचा शेवटचा सामना ठरला.
- आपल्या शेवटच्या सामन्यानंतर तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
- मिश्र दुहेरी प्रकारात सानिया आणि तिचा क्रोएशियन जोडीदार मेट पॅव्हिक यांना गतविजेत्या नील कुप्स्की आणि डिझायर क्रोजिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
- भारतीय महिला टेनिसला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात सानियाचे मोठे योगदान आहे.
- तिने आपल्या 20वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा, विम्बल्डन आणि यूएस खुल्या टेनिस स्पर्धांतील महिला दुहेरी प्रकारात प्रत्येकी एक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे.
- याशिवाय, फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आणि यूएस खुली टेनिस स्पर्धांतील मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपदं मिळवली आहेत.
- 2016 मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत तिने महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.
भारतीय मुलींची लंकेत धडाकेबाज कामगिरी :
- भारतीय पुरुष संघ इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर असताना भारतीय महिलासंघ देखील श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता.
- तर या दौऱ्यात प्रत्येकी तीन सामन्यांची टी 20 आणि एकदिवसीय मालिका भारतीय मुलींना खेळायची होती.
- तर या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय महिला संघाने धडकेबाज कामगिरी केली आहे.
- टी 20 पाठोपाठ मुलींनी एकदिवसीय मालिकादेखील 3-0अशी जिंकली आहे.
दिनविशेष :
- 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
- 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
- रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.