8 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

मीराबाई चानू
मीराबाई चानू

8 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2022)

रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ :

  • रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केली.
  • रेपो दर 35 आधार बिंदूंनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी वाढवून तो 6.25 टक्क्यांवर नेणारी चालू वर्षांतील मे महिन्यापासून ही सलग पाचवी वाढ आहे.
  • त्यामुळे गृह, वाहन आदी कर्ज आणखी महागणार आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण 225 आधार बिंदूंची दरवाढ केली आहे.
  • आधी चारवेळा केलेली दरवाढ ही ‘एमपीसी’च्या सहाही सदस्यांच्या पूर्ण सहमतीने झाली होती.

मीराबाईची रुपेरी कामगिरी :

  • भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने मनगटाच्या दुखापतीवर मात करत बुधवारी जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
  • मीराबाईने एकूण 200 किलोचे वजन उचलले.
  • टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या मीराबाईने 49 किलो वजनी गटात सहभाग नोंदवला.
  • तिने स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 113 किलो असे एकूण 200 किलो वजन उचलत रौप्यकमाई केली.
  • चीनच्या जिआंग हुईहुआने 206 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.
  • चीनच्याच होऊ झीहुआने 198 किलो कांस्यपदक जिंकले.
  • जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाईचे हे दुसरे पदक ठरले.
  • यापूर्वी 2017 मध्ये अ‍ॅनाहाइम, अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक पटकावले होते.

बांगलादेशची भारतावर 5 धावांनी मात :

  • एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला.
  • त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बांगलादेशने 5 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली.
  • या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला.
  • मात्र तरी तो फलंदाजीसाठी आला त्याने झुंजार अर्धशतक करत 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन :

  • नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी आयसीसीने, तीन खेळाडूंना नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू (ICC Player of the Month) साठी नामांकित केले आहे.
  • ज्यामध्ये दोन खेळाडू इंग्लंड संघाचे आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा एक खेळाडू देखील आहे.
  • यामध्ये भारतीय संघाच्या एकाही खेळाडूच्या नावाचा समावेश नाही.
  • या तिघांपैकी एकाला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे.
  • या यादीत आयसीसीने इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना स्थान दिले आहे.

अ‍ॅडम झाम्पा मेलबर्न स्टार्सचा नवा कर्णधार :

  • बिग बॅश लीग 2022-23 (BBL 2022-23) या स्पर्धेला 13 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
  • आगामी हंगामासाठी मेलबर्न स्टार्सचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मेलबर्न स्टार्सने 7 डिसेंबर रोजी अधिकृतपणे घोषित केले की, अ‍ॅडम झाम्पा जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी आगामी बीबीएलच्या बाराव्या हंगामात कर्णधार म्हणून भूमिका पार पडेल.
  • त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस उपकर्णधार असणार आहे.

दिनविशेष:

  • हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म 8 डिसेंबर 1897 मध्ये झाला होता.
  • भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत सन 1937 पासून धावू लागली.
  • भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर सन 1971 मध्ये हल्ला केला.
  • सन 1985 मध्ये सार्क परिषदेची स्थापना झाली.
  • ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने सन 2004 मध्ये भेट दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.