7 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

हरमनप्रीत सिंग
हरमनप्रीत सिंग

7 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2022)

भारताचा बांगलादेशबरोबर कुशियारा पाणीवाटप करार :

 • भारत आणि बांगलादेशमधील परस्पर विश्वासाला बाधा आणणाऱ्या अतिरेकी मूलतत्ववादी शक्तींचा एकत्र येऊन मुकाबला करू, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
 • भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत त्यांनी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली.
 • या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये 25 वर्षांमधला पहिला जलवाटप करारही अस्तित्वात आला आहे.
 • पंतप्रधान मोदी आणि शेख हसिना यांच्या भेटीनंतर एकूण 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
 • यामध्ये कुशियारा नदी जलवाटपाचा करार सर्वात महत्त्वाचा ठरला आहे.
 • बांगलादेश आणि भारतामध्ये 54 सामायिक नद्या आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस :

 • ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी अधिकृतपणे नियुक्ती जाहीर केली आहे.
 • त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील.
 • सोमवारी कन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षात झालेल्या निवडणुकीत ट्रस यांनी भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला होता.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना लसीला मंजुरी :

 • करोना लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
 • ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘भारत बायोटेक’च्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
 • 18 वर्षावरील सर्वांना ही लस देता येणार असून, करोना विरूद्धच्या आमच्या लढ्याला आणखी मजबूत करणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने करोना विरोधातील लढ्यात विज्ञान, संशोधन आणि मानवी संसाधनांचा उपयोग केला.
 • नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे.
 • म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
 • अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात.

14,500 शाळांत ‘पंतप्रधान श्री’ योजना :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी नवी ‘पंतप्रधान श्री’ (प्राईम मिनिस्टर- स्कूल फॉर रायिझग इंडिया) योजना जाहीर केली.
 • या योजने अंतर्गत देशातील 14 हजार 500 शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
 • या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
 • तसेच या शाळांतून शिक्षणाची अत्याधुनिक, कालसुसंगत आणि सर्वागिण पद्धत अवलंबिली जाईल.
 • शिकविण्याची पद्धत ही मुलांची शोधात्मक आणि ज्ञानोपासनेची वृत्ती जोपासणारी असेल.
 • तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातून शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला आहे.

हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन :

 • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.
 • भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
 • पीआर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
 • तसेच प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे.
 • महिलांत सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही.

सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा :

 • भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे.
 • रैना हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात ओळखला जातो.
 • तर याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं.
 • तसेच आता त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे.
 • याआधी त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.

दिनविशेष:

 • आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.
 • हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
 • 7 सप्टेंबर 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
 • सन 1923 मध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
 • सन 1931 मध्ये दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
 • मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात सन 1978 मध्ये यश.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.