7 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

7 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2021)

बेजांमिन लिस्ट आणि डेव्हीड डब्ल्यू.सी मॅकमिलन यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर :

  • नवीन रेणू कार्बनी उत्प्रेरकांच्या मदतीने तयार करून हरित रसायनशास्त्राची पायाभरणी करणारे जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे बेजांमिन लिस्ट तर प्रिन्स्टन विद्यापीठाचे डेव्हीड डब्ल्यू.सी मॅकमिलन यांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • असममितीय कार्बनी उत्प्रेरण तंत्रासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
  • लिस्ट व मॅकमिलन यांनी 2000 मध्ये नवीन प्रकारचे उत्प्रेरक तंत्र शोधून काढले होते.
  • तसेच त्यांचे हे संशोधन स्वतंत्रपणे करण्यात आले होते. या तंत्राचा उपयोग मानवतेला आधीपासून होत आहे फक्त आता त्यावर शिक्कामोर्तब होत आहे असे नोबेल समितीने म्हटले आहे.
  • तर गेल्या वर्षी फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी व अमेरिकेच्या जेनिफर डोडना यांना जनुकीय संपादनासाठी रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले होते.
  • नोबेल पुरस्कार 1.14 दशलक्ष डॉलर्सचा असून स्वीडिश संशोधक आल्फ्रेड नोबेल यांनी ठेवलेल्या निधीतून हे पुरस्कार देण्यात येतात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2021)

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलल जाणार :

  • शहरं, योजना आणि संस्थांनंतर आता राष्ट्रीय उद्यानांची नावंही बदलली जाणार आहेत.
  • देशातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेल्या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे करण्यात येईल.
  • तसेच या प्रस्तावाबाबत औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि लवकरच या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते.

पी. आर. श्रीजेश आणि सविता पुनिया यांनी सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार :

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) बुधवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताचे वर्चस्व दिसून आले.
  • पाच भारतीय हॉकीपटूंसह पुरुष आणि हॉकी या दोन्ही संघांच्या मुख्य प्रशिक्षकांनी सर्वाधिक मतांच्या बळावर पुरस्कारांवर मोहोर उमटवली.
  • भारताच्या पुरुष हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवताना कांस्यपदक पटकावले.
  • तसेच महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीचा पल्ला गाठला.
  • तर दोन्ही संघांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंगला, तर महिलांमध्ये गुर्जित कौरला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • भारताच्याच पी. आर. श्रीजेश आणि सविता पुनिया यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.
  • विवेक सागर प्रसाद आणि शर्मिला देवी यांची सर्वोत्तम उदयोन्मुख हॉकीपटू म्हणून निवड करण्यात आली.

हर्षल पटेलने आणखी एक विक्रम केला आपल्या नावावर :

  • आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हर्षल पटेलने आपल्या नावावर केला आहे.
  • तर हा विक्रम प्रस्थापित करताना त्याने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराला मागे टाकलं आहे.
  • हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलने 4 षटकात 33 धावा देत 3 गडी बाद केले.
  • तर 14 व्या आयपीएल स्पर्धेत हर्षल पटेलने आतापर्यंत एकूण 29 गडी बाद केले आहेत.
  • तसेच हर्षल पटेलने हा विक्रम मोडण्यापूर्वी जसप्रीत बुमराच्या नावावर हा विक्रम होता.

ले.ज. नदीम अहमद अंजुम आयएसआयच्या प्रमुखपदी :

  • पाकिस्तानच्या शक्तिशाली अशा इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेत अनपेक्षित फेरबदल करण्यात आला असून, लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांना तिचे नवे प्रमुख नेमण्यात आले आहे.
  • तर ले.ज. अंजुम हे लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची जागा घेतील. हमीद यांची पेशावर कॉप्र्सचे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • लेफ्टनंट जनरल अंजुम हे यापूर्वी कराची कॉप्र्सचे कमांडर होते.
  • तसेच सप्टेंबर 2019 मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती देण्यात आली.

दिनविशेष:

  • 7 ऑक्टोबर ख्रिस्त पूर्व 3761 हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
  • महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र 7 ऑक्टोबर 1919 मध्ये सुरू केले.
  • 7 ऑक्टोबर 1919 मध्ये के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
  • मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा 7 ऑक्टोबर 1866 जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.