7 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

7 October 2019 Current Affairs In Marathi

7 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2019)

भारतात घेऊन येणार पहिलं राफेल विमान :

 • राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणं मंत्री राजनाथ सिंह पॅरिसला जाणार आहेत.
 • 8 ऑक्टोबर रोजी पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी विजयादशमी असल्याने राजनाथ पॅरिसमध्ये राफेलचे पुजन अर्थात शस्त्रपूजन करणार आहे.
 • तर राजनाथ सिंह लवकरच पॅरिसला जाणार आहेत. तिथे ते फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मैक्रो यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे भारतासाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल विमान सुपूर्द करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2019)

ऑर्बिटरने पाठवली चंद्रावरील छायाचित्रे :

 • चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरवर बसवण्यात आलेल्या ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्याने (ओएचआरसी) चंद्राच्या पृष्ठभागाची टिपलेली छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपलब्ध केली आहेत.
 • तसेच इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे ऑर्बिटरकडून पाच सप्टेंबर 2019 रोजी भारतीय प्रमाण वेळ 4.30 वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतली गेली.
 • तर या छायाचित्रांत बोग्युस्लावस्की ई. क्रेटरचे (विवर) काही भाग टिपले गेले आहेत. या विवराचा व्यास 14 किलोमीटर व खोली तीन किलोमीटर असून हे विवर चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात आहे.
 • या छायाचित्रांत चंद्रावर पाण्याने किंवा हवेने घासून वाटोळे झालेले मोठे खडक असल्याचे दाखवले आहेत, असे इस्रोने म्हटले.

भारताचं अव्वल स्थान कायम :

 • विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.
 • सध्याच्या घडीला भारतीय संघ 160 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे.
 • भारताच्या खालोखाल न्यूझीलंड आणि श्रीलंका 60 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
 • दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे.

मोहम्मद शमीला दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत स्थान :

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत आफ्रिकेवर 203 धावांनी मात केली.
 • मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात 5 फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
 • तर या 5 फलंदाजांपैकी 4 फलंदात हे त्रिफळाचीत होऊन माघारी परतले आहे. या कामगिरीसह मोहम्मद शमीला दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.

दिनविशेष:

 • 7 ऑक्टोबर ख्रिस्त पूर्व 3761 हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
 • महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र 7 ऑक्टोबर 1919 मध्ये सुरू केले.
 • 7 ऑक्टोबर 1919 मध्ये के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
 • मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा 7 ऑक्टोबर 1866 जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.