7 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2018)
केळ्यातील डीएनए वेगळा करण्याचा जागतिक विक्रम:
- अखिल भारतीय विज्ञान महोत्सवात जी. डी. गोयंका पब्लिक स्कूलच्या 550 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी केळ्यातील ‘डीएनए’ वेगळा करण्याचा विक्रम येथे केला.
- तर या विक्रमाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद केली गेली आहे.
- तसेच यापूर्वी अमेरिकेतील सियाटल चिल्ड्रेन रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या 302 विद्यार्थ्यांनी डीएनए वेगळा करण्याचा प्रयोग केला होता.
- तर ‘डीएनए’ वेगळा करणारे पाचशेहून अधिक संच या उपक्रमात वापरले गेले. या संचात इथेनॉल, प्लास्टिकची बंद करता येणारी पिशवी, सोडियम डोडेसिल सल्फेट, बफर यांचा वापर करण्यात आला.
लक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डी यांच्याकडे ज्युनिअर भारतीय संघाचे नेतृत्व :
- सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे 5 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर मुलींचे नेतृत्व वैष्णवी
रेड्डी करेल. - तसेच भारतीय पथकात 13 मुले आणि 11 मुलींचा समावेश आहे.
- तर निवड समितीने दोन्ही स्पर्धांमध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे खेळाडू निवडले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
मसाल्यांचे बादशाह ‘एमडीएच’चे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे निधन:
- मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले ‘एमडीएच’ कंपनीचे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते 99 वर्षांचे होते.
- चुन्नी लाल गुलाटी यांचे खरे नाव महाशय धरमपाल गुलाटी होते.
- तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.
- तर सध्याच्या घडीला जवळपास 100 देशांमध्ये ‘एमडीएच’ कंपनीचा कारभार चालतो.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती:
- एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मुलांना 12 वी नंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या कर्मचारी विभागामार्फत आदेश देण्यात आले आहेत.
- तर या योजनेचा लाभ महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे.
- तर ही रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बॅंकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल.
दिनविशेष:
- 7 ऑक्टोबर ख्रिस्त पूर्व 3761 हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
- महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र 7 ऑक्टोबर 1919 मध्ये सुरू केले.
- 7 ऑक्टोबर 1919 मध्ये के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
- मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा 7 ऑक्टोबर 1866 जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा