7 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
7 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 मे 2022)
स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जोरदार पुरस्कार :
- स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच, आपण परदेशी वस्तूंचे नकळत मानसिक गुलाम होत आहोत का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
- त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून दैनंदिन वापरातील वस्तूंची यादी करावी.
- तर त्यातील परदेशी वस्तूंच्या जागी स्वदेशी उत्पादनांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा जोरदार पुरस्कार केला.
- स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘जीतो कनेक्ट 2022’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूरभाष पद्धतीने केले.
Must Read (नक्की वाचा):
आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर :
- चीनमधील ताज्या करोना लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे हांगझो येथे 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
- नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.
- करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शांघायमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
- त्यामुळे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेपुढे अनिश्चिततेचे सावट पसरले होते.
- 61 क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या आशियाई स्पर्धेत सुमारे 11 हजारांहून अधिक क्रीडापटू सहभागी होणार होते.
ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये :
- आयपीएलचा पंधरावा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा ठरला आहे.
- तर या हंगामात दिग्गज संघांना धक्का बसला असून ते सध्या गुणतालिकेत शेवटी आहेत.
- तर दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्ससारखे संघ गुणतालिकेत टॉप चारमध्ये असून त्यांनी धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे.
- तसेच लखनऊ, गुजरात या संघांसोबतच राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांनी गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली आहे.
- अन्य संघांच्या तुलनेत जास्त विकेट्स घेतल्यामुळेच या संघांना गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यात यश मिळाले आहे.
- मुंबई इंडियन्स हा संघ सर्वात जास्त म्हणजेच 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला संघ आहे.
रोहित शर्माने केली ‘ही’ अनोखी कामगिरी :
- आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे.
- दरम्यान, सलामीला आलेल्या रोहित शर्माने तर अवघ्या 28 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या.
- तसेच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आगळ्यावेगळ्या कामगिरीची नोंद झाली आहे.
- तर हे षटकार लगावताच त्याने एकट्या मुंबई संघाकडून खेळताना 200 षटकार लगावण्याचा विक्रम केलाय.
- मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर आता 201 षटकार आहेत.
दिनविशेष :
- 7 मे 1907 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅमसुरू झाली.
- सोनी ह्या कंपनी ची स्थापना 7 मे 1946 मध्ये झाली.
- एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.
- लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 7 मे 1990 मध्ये प्रदान.
- 7 मे 1992 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
- पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 मध्ये जन्म.