7 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

BYJU लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक रवींद्रन
BYJU लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक रवींद्रन

7 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 मे 2020)

अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी अव्वलस्थानी कायम :

 • जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8.7 ट्रिलियन डॉलरहून कमी होऊन 8 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीवरुन ही माहिती समोर आली आहे.
 • फोर्ब्सने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे.
 • 2019 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 106 होती. ही संख्या यावर्षी कमी होऊन 102 झाली आहे.
 • तसंच अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीमध्येही 23 टक्क्यांची घट झाली असून आता 313 बिलियन डॉलर इतकी संपत्ती झाली आहे.
 • पण, फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या या यादीमध्ये भारतातून यावेळी पहिल्यांदाच BYJU लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक रवींद्रन यांचाही समावेश झाला आहे.
 • 1.8 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये समावेश होणारे ते सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत.
 • तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या 36.8 बिलियन डॉलर्ससह या यादीतील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय.
 • त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डि-मार्ट सुपरमार्केट) संस्थापक राधाकृष्ण दमानी हे आहेत. 13.8 बिलियन डॉलरसह ते पहिल्यांदाच भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर, एचसीएल ग्रुपचे सहसंशतापक शिव नाडर 11.9 बिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मे 2020)

कोरोनावरील जगातील पहिली लस तयार :

 • मानवी शरीरावर परिणामकारक लस शोधल्याचा दावा इटलीनं केला आहे. रोमच्या स्पॅल्लानझनी रुग्णालयात लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. काही उंदरांवर लसीचे प्रयोग करण्यात आले.
 • तर लस टोचल्यानंतर उंदरांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. या अँटीबॉडीज मानवी शरीरात परिणामकारक ठरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
 • इटलीमध्ये तयार करण्यात आलेली लसीची अतिशय प्रगत टप्प्यावर चाचणी सुरू असल्याची माहिती टॅकिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी ओरीसिच्चिओ यांनी दिली.
 • टॅकिसकडून कोरोनाच्या लसीवर काम सुरू आहे. त्यांनी इटलीमधील एएनएसए वृत्तसंस्थेशी संवाद साधताना लसीची माहिती दिली.
 • तसेच उन्हाळ्यानंतर या लसीची माणसांवर चाचणी सुरू होईल, असंदेखील ओरीसिच्चिओ म्हणाले.

कर्नाटक सरकारचे 1610 कोटी रुपयांचे मदत पॅकेज :

 • करोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या लोकांसाठी कर्नाटक सरकारने बुधवारी 1 हजार 610 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले.
 • याचवळी, महसूल वाढवण्यासाठी मद्यावरील उत्पादन शुल्क 11 टक्क्य़ांनी वाढवण्याचा निर्णयही सरकारने घेतला.
 • मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये, टाळेबंदीमुळे ज्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे अशा हजारो धोबी, न्हावी, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाईचा समावेश आहे.
 • याशिवाय, या पॅकेजद्वारे शेतकरी, फूल बागायतदार, लघू व मध्यम उद्योजक, मोठे उद्योग, विणकर आणि बांधकाम मजूर यांनाही मदत केली जाणार आहे.
 • सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क 11 टक्क्य़ांनी वाढवले असून; अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सहा टक्के वाढीव्यतिरिक्त ही वाढ असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात दारूची ऑनलाइन विक्री सुरू करणार :

 • दारू हा राज्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत महसुली उत्पन्न वाढवायचे असेल तर दारू दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका राज्य मंत्रिपरिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी व्यक्त केली.
 • तर योग्य नियोजन करून ही दुकाने मुंबईसह राज्यभर सुरू करण्याबाबत एकमत झाले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 • याशिवाय ऑनलाइन पद्धतीने दारू विक्री करण्यास अनुमती देण्यात येणार आहे मात्र तत्पूर्वी त्यासाठी इतर राज्यांनी अवलंबिलेल्या पद्धतीची माहिती घेतली जाईल.
 • तसेच दारू दुकानांवरील उसळत असलेली गर्दी कमी करण्यासाठी काही काळ बीअर शॉपीमधून दारूची विक्री करण्यास परवानगी दिली जावी असेही बैठकीत ठरले सूत्रांनी सांगितले.

फेक न्यूजपासून वाचण्यासाठी WhatsApp ने आणलं खास फीचर :

 • देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
 • व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे.
 • व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी ही व्हॉट्सअ‍ॅपने फेक न्यूजला आळा घालण्यासाठी नवं फीचर आणलं आहे.
 • पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी
 • व्हॉट्सअ‍ॅपने भागीदारी केली आहे. IFCN ने व्हॉट्सअ‍ॅपवर आपला चॅटबॉट लाँच केला आहे.
 • +1 (727) 2912606 हा चॅटबॉटचा नंबर आहे. हा नंबर युजर्सना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. चॅटबॉट सुरू करण्यासाठी ‘Hi’ शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा.
 • IFCN चं हे चॅटबॉटफक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. मात्र लवकरच हिंदी, स्पॅनिशसह इतर भाषांमध्ये ते अपडेट करू शकतात.
 • चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जाणून घेऊ शकतात.
 • व्हॉट्सअ‍ॅपवरचे सर्व मेसेज अँड-टू-अँड एन्क्रिप्शनसोबत येतात. कंटरी कोडच्या मदतीने हे केलं जातं.
 • व्हॉट्सअ‍ॅप युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मिळवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिनविशेष :

 • 7 मे 1907 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅमसुरू झाली.
 • सोनी ह्या कंपनी ची स्थापना 7 मे 1946 मध्ये झाली.
 • एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.
 • लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 7 मे 1990 मध्ये प्रदान.
 • 7 मे 1992 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
 • पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 मध्ये जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मे 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.