7 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Darren Sammy - New Pakistan Coach
Darren Sammy – New Pakistan Coach

7 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 मार्च 2020)

अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा :

 • अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. गेल्या काही वर्षांपासून अर्थव्यवस्थेला मरगळ आल्यानं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याला चालना देण्यासाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली.
 • तर मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पुढील दोन वर्षांसाठी ही सवलत देण्यात आली आहे.
 • तसेच एमएमआरडीए, पुणे, नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रात येणाऱ्या बांधकांमांना ही सवलत लागू असेल. यामुळे राज्याला 25 हजार कोटींचं नुकसान होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
 • राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपुरमध्ये ही सवलत लागू होणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2020)

Daren Sammyकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद :

 • वेस्ट इंडिज संघाला दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. पाकिस्तान सूपर लीगमध्ये सॅमी पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
 • तर आता सॅमीला पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपदच देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही काळात सॅमी पाकिस्तानी नागरिक झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
 • पाकिस्तान सूपर लीगसाठी पाकिस्तानमध्ये दाखल होणारा सॅमी हा पहिला परदेशी खेळाडू आहे.
 • तर सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं 2012 आणि 2016 मध्ये पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2017पासून तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटपासून दूर आहे.
 • त्यानं 68 ट्वेंटी-20 सामन्यांत 587 धावा आणि 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 38 कसोटी आणि 126 वन डे सामनेही आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची ‘महाभेट’ :

 • उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे.
 • यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली.
 • तर सोपी सुलभ, हेलपाटे न घालता, सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी 2015 ते 2019-19 या कालावधीतील 2 लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले.
 • 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 2019 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून 2020 पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास, त्या शेतकऱ्यांना 2018-19 या वर्षात घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. तसेच, ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Twitter वर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार :

 • मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं.
 • तर ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे. कारण आणखी एक भन्नाट फीचर लवकरच ट्विटर आपल्या युजर्ससाठी आणणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एडिट ट्विट फीचरची मागणी होत होती. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या फीचरसारखे आहे.
 • तसेच ट्विटरवर युजर्सना आतापर्यंत फक्त ट्विट करण्याची सुविधा होती. परंतु, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टोरी आणि स्टेट्सचे फीचर या ठिकाणी नाही. मात्र आता ट्विटरवर Fleet नावाच्या आणखी एका नवीन फीचरची चाचणी करण्यात येत आहे.
 • या नवीन फीचरच्या मदतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं तर ते एका वेगळ्या टाईमलाईनवर दिसेल. तसेच 24 तासांनंतर हे आपोपाप गायब होईल. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक स्टेट्स यासारखे हे नवे फीचर असणार आहेत.

दिनविशेष:

 • ‘फोटोग्राफी’चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म 7 मार्च 1765 रोजी झाला.
 • 7 मार्च 1849 मध्ये महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म झाला होता.
 • ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म 7 मार्च 1911 रोजी झाला होता.
 • 2009 या साली केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2020)

You might also like
1 Comment
 1. Aj shaha says

  👍👍👍

Leave A Reply

Your email address will not be published.