7 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

धोनीचा निवृत्तीचा निर्णय
धोनीचा निवृत्तीचा निर्णय

7 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 जून 2020)

अमित शहा यांची ऑनलाइन सभा:

 • केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शहा आज(रविवार) या पार्श्वभूमीवर ७२ हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
 • जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शहा यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे.
 • ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जून 2020)

जी सेव्हनमध्ये सहभागी होण्यावरून चीनचा भारताला इशारा

 • आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना असलेल्या जी सेव्हनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणारा भारत आगीशी खेळत असल्याचा धमकी वजा इशारा चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखामधून देण्यात आला आहे.
 • भारताचा समावेश करुन घेत हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील आपली ताकद वाढवण्याचा अमेरिकेचा इरादा असून चीनची कोंडी करण्यासाठी हा डाव असल्याचे लेखात म्हटले आहे.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २ जून रोजी रात्री फोनवरुन चर्चा झाली.
 • जी सेव्हनचा विस्तार करण्याचा विचार हा भूप्रदेशासंदर्भातील राजकारणावर आधारित आहे.
 • भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने त्याला या परिषदेमध्ये सामावून घेतलं जात नसून अमेरिका भारताला आपल्या हिंदी महासागरातील योजनांचा महत्वाचा जोडीदार समजत आहे.

निवृत्तीबाबत चर्चा करून धोनीवर दडपण आणू नये : किरण मोरे

 • गेल्या ११ महिन्यांपासून महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे पुनरागमन करणे धोनीला कठीण जाणार असले तरी निवृत्तीबाबत सातत्याने चर्चा करून धोनीवर दडपण आणू नये.
 • त्याने कधी निवृत्त व्हायचे, हे त्यालाच ठरवू द्या, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केली.
 • ३८ वर्षीय धोनी मार्च महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात करणार होता.

दिनविशेष :

 • महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ 7 जून 1893 मध्ये सुरू केली होती.
 • 7 जून 1975 मध्ये क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
 • आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी 7 जून 1994 रोजी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.