7 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

7 January 2020 Current Affairs In Marathi
7 January 2020 Current Affairs In Marathi

7 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 जानेवारी 2020)

वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई-श्री’चा मानकरी :

 • शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करत आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करणाऱ्या हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.
 • तर ‘दिव्यांगांच्या मुंबई-श्री’ स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फॉच्र्युन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने ‘नवोदित मुंबई-श्री’चा मान पटकावला.
 • तसेच मालाड पूर्वेला झालेल्या या स्पर्धेत चार विविध प्रकारांमध्ये झालेल्या 200 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबासाठी सहा गटविजेत्यांमध्ये कडवी लढत रंगली होती. अखेर पंचांनी वैभव, शुभम आणि खुशाल यांच्या शरीरसौष्ठवाची तुलना केली. काही मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी वैभव जाधवला किताब विजेता घोषित केले.
 • तर दोन गटांत झालेल्या ‘दिव्यांग-श्री’ स्पर्धेत 16 स्पर्धकांनी कमावलेली शरीरसंपदा पाहून प्रेक्षकही थक्क झाले. 50 आणि 55 किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुदिश शेट्टीने यश संपादन केले. 50 किलो गटात माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले पहिला आला.

दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार :

 • मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा मानाचा 2020 चा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर झाला असून मुंबईत लवकरच पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
 • शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • तसेच रायकर यांनी इंग्रजी आणि मराठी राजकीय पत्रकारितेमध्ये केलेल्या अर्धशतकी कारकिर्दीबद्दल त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 • तर ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्षही आहेत. एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी, तरुण भारतच्या पत्रकार जान्हवी पाटील आणि लोकसत्ताचे पत्रकार संजय बापट यांची राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन :

 • ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
 • चित्रकलेच्या विश्वात स्वत:ची वेगळी ओळख पदमसी यांनी निर्माण केली होती. पदमसी यांनी चित्र-शिल्प, चित्रपटनिर्मिती, छायाचित्रण, एन्ग्रेव्हिंग, लिथोग्रफी, तसेच संगणक चित्रे अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी केली. त्यांची विचारवंत, प्रयोगशील कलाकार अशी ओळख होती.
 • कलाशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच 1952मध्ये त्यांची पॅरिसमध्ये दोन समूह-प्रदर्शने झाली. त्यांत त्यांच्याबरोबर रझा व सुझा हे चित्रकार होते. त्याच वर्षी त्यांच्या ‘वुमन विथ द बर्ड’ या चित्राला ‘जर्नेल-डी. आर्ट’ हा फ्रान्समधील पुरस्कार मिळाला, तर 1953 मध्ये इंटरनॅशनल बिनाले, पॅरिस या प्रदर्शनात चित्र मांडण्याचा मान मिळाला.

दिनविशेष:

 • युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म 7 जानेवारी 1827 मध्ये झाला होता.
 • स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झाला होता.
 • लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.
 • सन 1927 मध्ये न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
 • कोलकाता येथे 7 जानेवारी 1935 रोजी इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
 • सन 1972 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.