7 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जगदीप धनखड
जगदीप धनखड

7 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2022)

उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड :

  • उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले असून त्यांनी विरोधी पक्षांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव केला.
  • उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत 93 टक्के मतदान झाले.
  • धनखड यांना 528 मते मिळाली, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. धनखड यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 73 एवढी आहे.
  • उपराष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांना मतदान करता येते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2022)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात अविनाश, प्रियंका यांची रौप्यपदकांची कमाई :

  • स्पर्धेच्या नवव्या दिवशी अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं मिळाली.
  • राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे आणि प्रियंका गोस्वामी यांनी भारताच्या रौप्यपदकांमध्ये भर घातली.
  • अविनाशने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात, तर प्रियंकाने 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला.
  • अविनाश आणि प्रियंकाच्या दोन पदकांसह भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये चार पदके जिंकली आहेत.
  • चालण्याच्या शर्यतीत भारताने 12 वर्षांनी पदक मिळवले.
  • यापूर्वी 2010 मध्ये सर्वप्रथम हरिमदर सिंगने 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले होते.

19 वर्षीय भारतीय कुस्तीपटू नवीन मलिकची अविश्वसनीय कामगिरी :

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे.
  • शनिवारी नवीन मलिक या 19 वर्षीय भारतीय कुस्तीपटूने पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले.
  • नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले पदक निश्चित केले.
  • नवीनने ताहिरचा 9-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
  • रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर नवीन मलिकने भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक जिंकले आहे.

कुस्तीमध्ये रवी कुमार दहिया अन् विनेश फोगटची सुवर्ण कामगिरी :

  • भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
  • पुरूषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनचा पराभव केला.
  • 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला.
  • त्यापाठोपाठ महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

दिनविशेष :

  • पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
  • 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
  • सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.