7 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

7 August 2019 Current Affairs In Marathi

7 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2019)

काश्मीर धोरण संसदेत संमत :

  • जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर लोकसभेने शिक्कामोर्तब केले.
  • तर अनुच्छेद 370 संपुष्टात आणण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारा प्रस्ताव 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आला. यामुळे गेली 70 वष्रे अमलात असलेला हा अनुच्छेद कायमस्वरूपी रद्द होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेश करणारे विधेयकही
  • तसेच जम्मू आणि काश्मीरमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णाना दहा टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. मात्र अनुच्छेद 370 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये उर्वरित देशातील सर्व कायदे लागू होऊ शकतील.
  • त्यामुळे या विधेयकाची आता गरज उरली नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही मंजुरी देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2019)

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन :

  • भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या.
  • तसेच भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती.
  • तर प्रकृतीच्या कारणावरून 2019ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

कसोटी क्रमवारीत स्मिथ तिसऱ्या स्थानी :

  • इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.
  • तर त्याचे 900 गुण झाले आहेत. विराट (922 गुण), केन विल्यमसन (913 गुण) यांच्यानंतर तो तिसर्या स्थानी आहे. या कसोटीपुर्वी त्याचे 857 गुण होते.
  • तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे तर पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
  • चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणार्या स्मिथने 144 व 142 धावांची खेळी केली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

दिनविशेष :

  • पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
  • 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
  • सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.