7 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

पॅट कमिन्स
पॅट कमिन्स

7 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 एप्रिल 2022)

फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी :

 • फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
 • श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर आहे.
 • अंबानी हे जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
 • तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे आणि ते
 • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.
 • HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप 10 श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.
 • तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीतील पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
 • तर या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2022)

अविनाश साबळेचा विक्रम :

 • स्टीपलचेसमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ‘एएफआय’ फेडरेशन चषक वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 13:39.43 सेकंद अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
 • तर 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम अविनाशनने मोडीत काढला.
 • तसेच महिलांच्या 200 मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासपासून ती एक शतांश सेकंदाने पिछाडीवर राहिली.
 • आसामच्या अमलान बोरगोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.52 सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

कमिन्सने रचला नवा विक्रम :

 • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 14 सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
 • तर या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून कोलकाताचा पाच गडी राखून विजय झाला आहे.
 • तसेच या विजयासाठी श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी दिमाखदार खेळ करत विजय अक्षरश: खेचून आणला. पॅट कमिन्सने
 • तर या डावात 15 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावा करुन नवा विक्रम रचला आहे.
 • तर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे.

भाजपाने बाजारात आणलं नवं चॉकलेट :

 • गुजरात भाजपाने एक नवं चॉकलेट बाजारात आणलं आहे.
 • तर या चॉकलेटच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे.
 • तसेच हे पौष्टिक न्यूट्रिशन बार सुरूवातीला गुजरात भाजपाचे प्रमुख सी आर पाटील यांनी संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना वाटण्यात आली.
 • तर या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला असून या एनर्जी बारमधल्या सामग्रीची माहितीही देण्यात आली आहे.
 • भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग यांनी या न्यूट्रिशन बारबद्दल माहिती दिली आहे.

दिनविशेष:

 • 7 एप्रिलजागतिक आरोग्य दिन
 • आर्य समाजाची स्तपना 7 एप्रिल 1875 मध्ये झाली.
 • 7 एप्रिल 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
 • पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वाशिग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन 7 एप्रिल 1940 मध्ये ठरले.
 • 7 एप्रिल 1947 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)ची स्थापना झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.