6 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 September 2018 Current Affairs In Marathi

6 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2018)

आधार नसल्यास विद्यार्थ्यांच्या सुविधा रोखता येणार नाहीत:

 • आधार कार्ड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही अशा शब्दांमध्ये आधार कार्ड बनविणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) देशातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बजावले.
 • बहुतांश शाळांनी विद्यार्थ्य़ांना आधार कार्डची सक्ती केली होती, यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षणापासून लांब रहावे लागत होते. आता यूआयडीएआईने याविरोधात पाऊल उचलले असून केवळ आधारकार्ड नाही म्हणून देशातील एकाही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊ नये असे आमचे धोरण आहे असं युआयडीआयने स्पष्ट केले आहे. Adhar Card
 • कोणत्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी अन्य कागदपत्रांचा वापर करावा, पण कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवू नये, अशा प्रकारची शाळांची मनमानी बेकायदेशीर आहे, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.
 • शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विभागातील बँका, पोस्ट कार्यालये, राज्याचा शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधावा आणि आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असेही यूआयडीएआयने सांगितले. मुलांना आधार नसल्यामुळे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे यूआईडीएआईने म्हटले आहे. याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे.

जागतिक स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या खेळाडूंची शासकीय सेवत नियुक्ती:

 • जागतिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विविध विभागांत 32 खेळाडूंना थेट नेमणुका मिळणार आहेत.
 • आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणारी धावपटू ललिता बाबर, कुस्तीगीर राहुल आवारे, पॉवरलिफ्टर अमित उदय निंबाळकर यांचा यामध्ये समावेश आहे.
 • रिओ ऑलिम्पिक गाजविणाऱ्या धावपटू ललिताची उपजिल्हाधिकारीपदी, तर राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुल आवारे यांची जिल्हा पोलीस उपअधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अमित निंबाळकर याची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांसह आणखी 32 खेळाडूंच्या थेट नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
 • अन्य खेळाडूंच्या नियुक्त्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागात तालुका क्रीडा अधिकारी, लिपिक, शिपाई या पदांवर करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या सर्व नियुक्त्यासंबंधीचा शासन आदेश जारी केला आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला कास्यपदक:

 • दिव्यांश सिंग पनवार आणि श्रेया अगरवाल यांनी आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात कांस्य पदकाची कमाई केली. मात्र भारताच्या वरिष्ठ नेमबाजांना पदकतालिकेत भर घालण्यात अपयश आले.
 • प्राथमिक फेरीत दिव्यांश आणि श्रेया यांनी 834.8 गुणांसह 42 संघांमधून अंतिम फेरी गाठताना पाचवे आणि अखेरचे स्थान मिळवले. मग अंतिम फेरीत 435 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
 • इटलीच्या सोफिया बेनेटी आणि मार्को सुप्पीनी जोडीने सुवर्णपदक तर इराणच्या सॅडेघियाना अर्मिना आणि मोहम्मद अमिर नेकौनम जोडीने रौप्यपदक पटकावले. भारताच्या ईलाव्हेनिल व्हॅलेरिव्हान आणि हृदय हझारिका या जोडीला प्राथमिक फेरीत 839.5 गुणांसह 13वे स्थान मिळाले.
 • आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यावर तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदके जमा आहेत.
 • भारताने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साकारली आहे. सध्या पदकतालिकेत भारत चीनसोबत तिसऱ्या स्थानावर आहे. यजमान कोरिया पहिल्या आणि रशिया दुसऱ्या स्थानावर आहे.

सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी:

 • भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. याच गटात भारताच्या अर्जुन सिंग चिमाने (218) कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या होजीन लिमला (243.1) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत सौरभवने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केली. त्याने जर्मनी येथे झालेल्या कनिष्ठ मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत बाजी मारताना विश्वविक्रम केला होता आणि तोच विक्रम त्याने मोडला.

प्रशांत मोरेला दुहेरी जगज्जेतेपदाचा मान:

 • दक्षिण कोरिया चूनचिऑन येथे झालेल्या पाचव्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारताच्या प्रशांत मोरेने पुरुष एकेरीत आणि एस. अपूर्वाने महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. भारताने या स्पर्धेमध्ये 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य अशा एकूण 12 पदकांची कमाई केली.
 • पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रशांतने सहकारी कर्णधार रियाझ अकबरअलीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत 25-5, 19-25, 25-13 असे पराभूत केले. पहिला सेट प्रशांतने सहज जिंकून सुरुवात छान केली होती; परंतु दुसरा सेट रियाझने जिंकला व सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रशांतने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि विजयश्री खेचून आणत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 • रियाझला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये झहीरने श्रीलंकेच्या माजी विश्वविजेत्या निसांथा फर्नाडोला 17-16, 25-0 अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली व कांस्यपदकाची कमाई केली.
 • महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात अपूर्वाने भारताच्याच काजल कुमारीचा 25-5, 25-14 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी 2016 मध्ये लंडन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्येही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताच्या आयेशा महम्मदने संघातील सहकारी कर्णधार रश्मी कुमारीला 5-25, 25-17, 25-10 असे तीन सेटमध्ये पराभूत करत कांस्यपदक पटकावले.

दिनविशेष:

 • सन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
 • भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
 • सन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
 • सन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. Ajay sanjay rokade says

  at shendurni tal jamner dist jalgaon

Leave A Reply

Your email address will not be published.