6 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर
तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर

6 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2021)

हवामानाच्या प्रारूपीकरणासाठी तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर :

  • जागतिक तापमानवाढीतील बदलांचा अंदाज वर्तवण्यासाठी पृथ्वीच्या हवामानाचे प्रारूपीकरण करण्याच्या कामगिरीसाठी यंदा जपान, जर्मनी व इटली या देशांच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
  • स्युकुरो मनाबे, क्लॉस हॅझलमन यांनी जागतिक तपमानवाढीच्या प्रारूपीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  • त्याचबरोबर गिओरगिओ पारिसी यांनी भौतिक प्रणालींमधील आंतरिक बदल हे आण्विक पातळीपासून ग्रहीय पातळीपर्यंत ओळखण्यासाठी संशोधन केले आहे.
  • नोबेल समितीने म्हटले आहे की, मनाबे व हॅझलमन यांनी पृथ्वीच्या हवामानविषयक ज्ञानाचा पाया घातला व त्याचा मानवावर कसा परिणाम होत आहे, याचा अभ्यास केला.
  • 1960 मध्ये मनाबे यांनी असे दाखवून दिले की, वातावरणात वाढणारे कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण हे जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे.
  • त्यातून सध्याच्या हवामान व तापमान प्रारूपांचा जन्म झाला. त्यानंतर दशकभराने हॅझलमन यांनी हवामान व वातावरण यांची सांगड घालणारे प्रारूप तयार केले त्यातून हवामान प्रारूपांच्या मदतीने वातावरणीय बदलांचे स्वरूप व त्याचा अंदाज करणे शक्य झाले.
  • मानवी कृतींचा हवामानावर होणारा परिणाम व त्याची चिन्हे काय आहेत, याचा शोध त्यांनी घेतला. पारिसी यांनी गणित, जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, मशीन लर्निंग यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीतील आंतरसंबंध स्पष्ट करणारी गणिती व भौतिकी प्रारूपे निश्चिात केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2021)

रक्त पातळ करणारी औषधे करोनात उपयोगी :

  • रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळे करोनाग्रस्त रुग्णात मृत्यू व रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अनुक्रमे 50 व 43 टक्के कमी होते,असे लॅन्सेटच्या इक्लिनिकल मेडिसीन जर्नलमधील शोधनिबंधात म्हटले आहे.
  • तर या संशोधनात 6195 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता, ते 18 वर्षे वयावरील होते.
  • अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ व स्वित्झर्लंडमधील बॅसेल विद्यापीठ यांनी याबाबतचे संशोधन केले असून रक्त पातळ करण्याची औषधे 90 दिवस करोनाग्रस्त रुग्णांना दिल्यास काय परिणाम होतात याचा शोध घेतला आहे.
  • तसेच त्यात करोना होण्यापूर्वी व नंतरच्या काळाचा विचार करण्यात आला असून रुग्णालयात दाखल करणे व मृत्यूचे प्रमाण या दोन निकषांवर तपासणी केली आहे.
  • संशोधकांच्या असे लक्षात आले,की रक्ताच्या गुठळ्या टाळणारी औषधे रुग्णांना दिली असता त्यांच्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ कमी येते तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होते.

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात ऐश्वर्यला सुवर्ण :

  • युवा भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर याआधी पात्रता फेरीत त्याने 1185 गुण मिळवताना विश्वविक्रमाची बरोबरी केली.
  • ऐश्वर्यने अंतिम फेरीत विश्वविक्रमी 463.4४ गुण प्राप्त केले, तर दुसऱ्या क्रमांकावरील फ्रान्सच्या ल्युकास क्राइझ्सने 456.5 गुण मिळवले.
  • अमेरिकेच्या गॅव्हिन बॅरनिकला 446.6 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

राजस्थानला हरवत मुंबईनं विक्रम रचलाच :

  • आयपीएल 2021 च्या 51 सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत केले.
  • मुंबईचा हा सहावा विजय असून कर्णधार रोहित शर्माने या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
  • टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
  • तर या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात 398 षटकार होते.
  • राजस्थानविरुद्ध त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले.
  • टी-20० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे.
  • त्याने 1042 षटकार ठोकले आहेत. 1000 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

अवकाशात होणार ‘द चलेंज’चित्रपटाचे शुटिंग :

  • अवकाश तंत्रज्ञानात अनेक बाबतीत पहिला देश म्हणून रशियाकडे मान जातो.
  • अवकाशात पहिला कृत्रिम उपग्रह पाठवणे, पहिला सजीव प्राणी ( ‘लाईका’ कुत्री ), पहिला अंतराळवीर ( युरी गागरीन) पाठवणे, अवकाश यानाच्या बाहेर पहिला स्पेस वॉक करणे, पहिले अवकाश स्थानक स्थापन करणे असे विक्रम रशियाने केलेले आहेत.
  • तर यात आता आणखी एका पराक्रमाची भर पडणार आहे. रशियाच्या ‘द चलेंज’ या चित्रपटातील 35 मिनीटांच्या भागासाठी चक्क पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शुटिंग केले जाणार आहे.
  • ‘द चलेंज’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्लिम शिपेंको आणि अभिनेत्री युरिया पेरेसिल्ड हे सोयुझ एमएस-19 या अवकाश यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहचले आहेत.
  • तसेच या प्रवासात त्यांच्याबरोबर 4 वेळा अवकाशवारी केलेले अनुभवी अन्टॉव्ह शेकप्लेरोव हे या अवकाश यानाचे कमांडर म्हणून होते.

मोदी जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये :

  • अमेरिकेमधील ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या ‘2021 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तीं’च्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आलाय.
  • मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आलेला आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘2021 मधील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्ती’ या यादीमध्ये उल्लेख ‘भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते’ असा करण्यात आलाय.
  • तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये ‘भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली’ असा आरोपही या लेखात करण्यात आलाय.
  • झकरिया यांनी जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात महत्वाचे नेते आहेत असं म्हटलंय. “जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून भारतासाठी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा मूलभूत साचा तयार केला.

दिनविशेष:

  • रेडिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1866 मध्ये झाला.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर सन 1949 रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
  • सन 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
  • जेसन लुइस याने 2007 या वर्षी वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.