6 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2018)

6 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2018)

भारत-रशियामध्ये एस-400 करार:

 • अमेरिका भलेही रशियाबरोबरील संबंधावरून जगभरातील देशांना धमकी देत असली तरी भारताने बहुचर्चित S-400 मिसाइलबाबतचा करार केल्यानंतर त्यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत.
 • अमेरिकेने सौम्य धोरण स्वीकारत आपल्याकडून लावण्यात येणार निर्बंध हे वास्तविक रूपात रशियाला दंडित करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
 • करार झाल्यानंतर काही तासाच्या आत अमेरिकन दुतावासातून पहिली प्रतिक्रिया समोर आली. अमेरिकेच्या निर्बंधाचा हेतू हा सहकारी देशांच्या सैन्य क्षमतांचे नुकसान करण्याचा नसल्याचे नवी दिल्ली स्थित दुतावासाने म्हटले आहे.
 • दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताने अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत रशियाबरोबर बहुप्रतिक्षित S-400 हवाई सुरक्षा यंत्रणेचा करार केला.
 • तसेच भारत आणि रशिया यांच्यात अवकाश सहकार्याशिवाय आठ मोठे करार झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2018)

डेनिस मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर:

 • संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शांततेच्या नोबेल पुरस्कारांची 5 ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात आली.
 • डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद या दोघांना संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर झाला आहे. nobel peace winners
 • युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • नॉर्वेच्या नोबेल समितीने मुक्वेगे आणि मुराद यांची निवड केली. यंदा या पुरस्कारासाठी 216 लोक आणि 115 संघटनांना नामांकन देण्यात आले होते.
 • तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात या दोघांना सन्मानित केले जाणार आहे.

डॉ. मोहन आगाशे ‘भावे पुरस्कारा’चे मानकरी:

 • मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे.
 • प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 • पंचवीस हजार रुपये गौरव पदक, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
 • मराठी रंगभूमीवर प्रदिर्घ सेवा करणाऱ्या रंगकर्मीला हा पुरस्कार देण्यात येतो. 1959 मध्ये पहिल्यांदा बालगंधर्व यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताच्या दिनेश सिंगला शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिले सुवर्णपदक:

 • मणिपूरच्या दिनेश सिंगने आशियाई कनिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर आंध्र प्रदेशच्या एन. रवीकुमारने त्याच गटात कांस्यपदक पटकावले. Dinesh Singh
 • पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात सुरू झालेल्या 52व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेमधील 75 किलो वजनी गटात भारताकडून दिनेश सिंगने चमक दाखवली. या गटात व्हिएतनामच्या ली गिआ हुए याने रौप्यपदक पटकावले.
 • गतवर्षी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये दिनेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्यानंतर हे पदक संपूर्ण देशाला समर्पित करीत असल्याचे त्याने सांगितले.
 • इम्फाळमधील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या दिनेश सिंगला या विजेतेपदानंतर अतोनात आनंद झाला. त्याने त्याच्या विजयाचे श्रेय गुरू आणि मार्गदर्शक के. प्रदीपकुमार सिंग यांना दिले आहे.
 • भारतासाठी 75 किलोवरील गटातील निकाल निराशाजनक ठरला. ठोकचोम ग्यानेंद्र आणि एल. हेनारी सरमा यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

आता देशांतर्गत प्रवासासाठी चेहराच ‘बोर्डिंग पास’:

 • देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांसाठी खूषखबर असून, संबंधितांना आता बोर्डिंग पासची आवश्यकताच भासणार नाही.
 • कारण, प्रवाशाचा चेहरा हाच बोर्डिंग पास असणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये वाराणसी, विजयवाडा, पुणे आणि कोलकाता विमानतळावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे.
 • फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘बायोमेट्रिक सॉफ्टवेअर‘ची मदत याकामी घेण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या चेहऱ्यांच्या बायोमेट्रिक तपशिलातून त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे.
 • तसेच या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना सातत्याने बोर्डिंग पास, पासपोर्ट आणि अन्य कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे जवळ बाळगण्याची अथवा ती दाखविण्याची आवश्यकता भासणार नाही.

दिनविशेष:

 • रेडिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1866 मध्ये झाला.
 • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर सन 1949 रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
 • सन 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
 • जेसन लुइस याने 2007 या वर्षी वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.