6 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

6 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 मे 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात चर्चा :

 • जर्मनी आणि डेन्मार्कचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले.
 • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा केली.
 • युक्रेन-रशिया युद्ध, दहशतवाद यांसह जागतिक प्रश्नांबाबत उभय नेत्यांत चर्चा झाली.
 • जागतिक हितासाठी भारत-फ्रान्स यांनी संयुक्त काम करण्यासाठी ब्लूपिंट्र तयार करण्यास या दोन्ही नेत्यांची सहमती दर्शविली.
 • मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात संरक्षण, अंतराळ, जागतिक अर्थव्यवस्था, नागरी आण्विक, जनसंबंध यांसह विविध विषयांवर आणि जागतिक घडामोडींवर चर्चा झाली.
 • तर या सर्व क्षेत्रांत भारत आणि फ्रान्स एकत्र काम करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मे 2022)

दिल्लीत मोफत वीज अनुदान ऐच्छिक असेल :

 • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत विजेबाबत मोठी घोषणा केली आहे.
 • आता अनुदान मागणाऱ्यांनाच मोफत वीज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 • 1 ऑक्टोबरपासून ही सुविधा ऐच्छिक होणार आहे.
 • तसेच ज्यांना अनुदान हवे आहे, त्यांनी त्यासाठी पर्याय निवडावा.
 • तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी स्टार्टअप धोरणाला मंजुरी दिली आहे.
 • दिल्लीतील ग्राहकांना सध्या 200 युनिटपर्यंतचे वीज बिल शून्य आहे आणि 201 ते 400 युनिट प्रति महिना वीज वापरल्यास 800 रुपये सबसिडी मिळते.
 • दुसरीकडे, स्टार्टअपसाठी भाड्याने घेतलेल्या जमिनीचे अर्धे भाडे सरकार देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
 • याव्यतिरिक्त, पेटंट, ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट फी भरली जाऊ शकते. सरकार इंटरनेट शुल्क भरण्यातही मदत करू शकते.
 • स्टार्टअप सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधाही दिली जाईल.

‘डब्ल्यूएचओ’च्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताचा जोरदार आक्षेप :

 • अधिकृत आकडेवारी उपलब्ध असतानाही करोना महासाथीशी संलग्न मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज दर्शवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताने गुरुवारी जोरदार आक्षेप घेतला.
 • तर यासाठी वापरण्यात आलेले प्रारूप आणि माहिती गोळा करण्यासाठी वापरलेली पद्धत संशयास्पद असल्याचे भारताने सांगितले.
 • करोना विषाणूमुळे किंवा आरोग्य यंत्रणेवरील त्याच्या परिणामामुळे गेल्या दोन वर्षांत सुमारे दीड कोटी लोक मरण पावल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गुरुवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला.
 • तर 60 लाख मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुपटीहून अधिक आहे.
 • तसेच यापैकी बहुतांश मृत्यू आग्नेय आशिया, युरोप व अमेरिका येथे झाले आहेत.

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धात भारताच्या सराव शिबिराला आनंद, गेलफंड यांचे मार्गदर्शन :

 • ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी 7 मेपासून सुरू होणाऱ्या सराव शिबिराला पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि बोरिस गेलफंड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
 • जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने पहिल्या सराव शिबिराची घोषणा गुरुवारी केली.
 • तर या स्पर्धेसाठी संघटनेने आनंदची प्रेरक आणि इस्रायलच्या गेलफंडची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 • चेन्नईच्या लीला हॉटेलमध्ये 7 ते 17 मे या कालावधीत हे शिबीर होणार आहे.
 • भारताला यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभणार असून ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नई येथे खेळवली जाणार आहे.
 • यजमान या नात्याने भारताला खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी दोन संघ निवडता आले आहेत.

दिनविशेष :

 • 6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
 • पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.
 • पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.
 • ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.
 • 6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
 • अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
 • 6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.