6 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 May 2019 Current Affairs In Marathi

6 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 मे 2019)

आज 7 राज्यातील 51 मतदारसंघामध्ये मतदान :

 • लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
 • तसेच मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये 674 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
 • तर 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
 • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. या फेरीमध्ये
  हिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मे 2019)

आता खासगी वितरकांकडेही मिळणार दर्शनिका :

 • शासकीय ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे येणाऱ्या पिढीला आकलन व्हावे, या उद्देशाने राज्याच्या दर्शनिका विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 • तर गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडेच उपलब्ध होणार्या जिल्हा-राज्य दर्शनिका आता लवकरच खासगी वितरकांकडेही उपलब्ध होणार आहेत.
 • दर्शनिका विभाग महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी काम करत आहे. या दर्शनिका गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडे उपलब्ध होत होत्या. मात्र, यामुळे त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते. परिणामी, वाचक आणि वितरक यांच्यातील ही दरी दूर करण्यासाठी दर्शनिका विभागाने ही सर्व गॅझेटिअर खासगी वितरकांकडे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच विभागामार्फत आतापर्यंत एकूण 87 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्व ग्रंथांच्या ई-बुक आवृत्तीदेखील प्रकाशित करण्यात आल्या असून, 40 हजारांपेक्षा जास्त पृष्ठे शासनाच्या संकेतस्थळावर ‘दर्शनिका’ या शीर्षकाखाली
  सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच :

 • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली; मात्र महिला लोकप्रतिनिधींना कमी लेखून राष्ट्रीय कार्यक्रमांच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत आयोगाने अमरावती विभागीय आयुक्तांकडून पाचही जिल्हा परिषदांचा अहवाल मागविला आहे.
 • तसेच निवडणुकीनंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या कारभाराच्या धोरणाचा आढावा आयोगाने घेतला. त्यासाठी आयोगाने आपल्या स्तरावर माहिती घेतली. त्यात ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी महिलांनी अनेक तक्रारी केल्या. त्यावर
  उपाययोजना करण्यासाठी आयोगाने संबंधित यंत्रणांकडून माहितीही मागवली. सोबतच शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.
 • शासनासह आयोगाने या तक्रारींबाबतचा अहवाल संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मागवला. तसे पत्र विभागीय आयुक्तांना दिले; मात्र अहवाल विभागीय आयुक्तांना सादर झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने अहवाल देण्याचे पंचायत विभाग, गटविकास अधिकाऱ्यांना बजावले आहे.

भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना दिला ई-व्हिसा :

 • भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण 2015 या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या 26 वरून 21 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
 • तसेच यासंदर्भात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिसाच्या उपश्रेणींची संख्या 104 वरून 65 इतकी करण्यात आली आहे.
 • 2015 साली इमिग्रेशन विभागाने 5.29 लाख ई-व्हिसा जारी केले होते. गेल्या वर्षी हीच संख्या 25.15 लाख इतकी झाली.
 • भारतीय दूतावासातर्फे देण्यात येणार्या पेपर व्हिसाची संख्या घटली आहे. 2015 साली अशा व्हिसांची 45 लाख इतकी असलेली संख्या 2018 साली 35 लाख झाली.
 • भारताकडून 166 देशांतील पर्यटक, नागरिकांना ई-व्हिसा देण्यात येतो. पर्यटन, वैद्यकीय, व्यावसायिक काम, कॉन्फरन्सला हजर राहणे अशा कारणांकरिता अर्ज केल्यापासून 72 तासांत ई-व्हिसा मिळतो. वेब शो, मालिका, चित्रीकरण स्थळे निवडण्यासाठी दौरा करणे अशा कारणांसाठी फिल्म व्हिसाही देण्यात येतो.
 • फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात 180 दिवस राहायची मुभा देण्यात आली आहे.

‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल :

 • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते.
 • आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
 • तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34, 25 अंशाच्या आसपास राहील.

दिनविशेष :

 • 6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
 • पेनी ब्लॅ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.
 • पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.
 • ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.
 • 6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
 • अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
 • 6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.