6 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 March 2019 Current Affairs In Marathi

6 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 मार्च 2019)

मँचेस्टर सिटीची गुंतवणुकीची योजना:

  • इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजला जाणारा मँचेस्टर सिटी हा क्लब आता भारतातील फुटबॉल क्लबमध्येही गुंतवणूक करणार आहे. या वर्षांच्या अखेरीस भारतातील फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचे मँचेस्टर सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरिआनो यांनी सांगितले. Footboll
  • ‘इंग्लिश प्रीमिअर लीगमधील विजेत्या मँचेस्टर सिटीने इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मुंबई सिटी एफशी या संघाशी बोलणी सुरू केली आहेत. त्याचबरोबर जमशेदपूर एफशी या संघाशीही प्राथमिक स्तरावर वाटाघाटी सुरू आहेत.
  • गेल्या वर्षी जमशेदपूर आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना पाहण्यासाठी आम्ही भारतात आलो होतो. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली मुंबई सिटीबरोबरची बोलणी एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहेत,’ असे मँचेस्टर सिटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
  • मँचेस्टर सिटीचे मालक अबूधाबीचे शेख मन्सूर यांनी अलीकडेच चीनमधील सिचूआन जिनियू हा क्लब खरेदी केला आहे. त्यांच्याकडे न्यू यॉर्क सिटी, मेलबर्न सिटी, जपानमधील योकोहामा एफ मरिनोस, अ‍ॅटलेटिको टॉक्र्यू तसेच गिरोना या संघांची मालकी आहे.
  • ‘ज्या देशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे आणि ज्या देशांत व्यापारासाठी संधी आहे, अशा चीन आणि भारतासारख्या देशांत गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आमची पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असे सोरिआनो यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2019)

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राजेंद्र बंडबेला सुवर्णपदक:

  • केरळमधील कन्नूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राजेंद्र बंडबे याने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. हे यश मिळवणारा तो कोकणातील पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे.
  • रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्ट्स कंपनीमध्ये सेवेला असलेल्या राजेंद्रने यापूर्वी स्थानिक आणि राज्य पातळीवरील विविध शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये यश मिळवले होते. पण भारतीय बॉडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तो प्रथमच उतरला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
  • लहानपणापासूनच व्यायामाची आवड असणाऱ्या राजेंद्रने गेल्या दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे यश संपादन केले आहे. दररोज 5 ते 6 तास व्यायाम, योग्य पौष्टिक आहार आणि पुरेशी विश्रांती या गोष्टींच्या काटेकोर पालनामुळे हे साध्य झाले.
  • घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आहार आणि प्रशिक्षणाचा खर्च कसा परवडणार, हा महत्त्वाचा प्रश्न कंपनीचे संचालक अर्जुन गद्रे आणि दीपक गद्रे यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे सहजपणे सुटला.
  • कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनीही निधी गोळा करून दिला. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष संसुळकर व अन्य सहकारी यांच्याकडून मोलाचे प्रशिक्षण मिळाले. या सर्वाच्या सहकार्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो, असे राजेंद्रने सांगितले.

भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध:

  • भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठोस पावले उचलली आहेत. यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी 5.6 अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही.
  • भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे. India-USA
  • अमेरिकी उत्पादनांना आपली बाजारपेठ पूर्णपणे खुली करून द्यायला भारत तयार नसल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
  • अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेत समान आणि व्यवहार्य संधी मिळायला हवी, यासाठी अमेरिका करीत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा देणारी ‘जनरलाइजड् सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस‘ (जीएसपी) ही सवलत रद्द करण्याची पावले उचलली जात आहेत. तसे पत्र ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधी गृहाला पाठवले आहे.
  • अर्थात त्याचे अध्यक्षीय आदेशात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम भारतावर होण्यास अवधी आहे.
  • भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जाणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी धक्कादायक असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम निवडणुकीपर्यंत दिसणार नसल्याने उद्योग विभागाने या कारवाईला फारसे महत्त्व दिल्याचे भासवलेले नाही. भारताप्रमाणेच तुर्कस्थानवरही अमेरिकेने हीच कारवाई केली आहे.

अभिनेता अक्षय कुमारचे डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण:

  • डिजीटल प्लॅटफॉर्मचे महत्त्व वाढले असून वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेब सीरिजचे विश्व दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये बडे कलाकारसुद्धा भूमिका साकारण्याची रुची दाखवत आहेत.
  • डिजीटल प्लॅटफॉर्ममध्ये आता आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार अॅमेझॉन प्राइमद्वारे डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे.
  • अॅमेझॉन प्राइम ओरिजीनलच्या ‘द एंड’ या सीरिजव्दारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलरने परिपूर्ण अशी ही सीरिज असणार आहे. ‘ही अत्यंत मजेशीर आणि काल्पनिक कथा आहे. याबद्दल मी सध्या फार काही सांगू शकत नाही पण त्यात प्रेक्षकांना खूप सारे अॅक्शन पाहायला मिळणार हे नक्की,’ असे अक्षयने सांगितले.

ज्येष्ठांसाठी एसटीची स्मार्ट कार्ड योजना:

  • एसटीच्या बनावट कार्डला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.
  • एसटीच्या मुंबई विभागाचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 5 मार्च रोजी ही योजना सुरू करण्यात आली. ST Mahamandal
  • मुंबई सेंट्रल आगारात विनायक कांशीराम गुरव (वय 70 वर्ष) यांना स्मार्ट कार्ड नोंदणीची पावती देऊन या योजनेअंतर्गत ज्येष्ठांच्या नाव नोंदणीस सुरुवात झाली. विभागीय सांख्यिकी अधिकारी एकनाथ मगदूम, आगार प्रभारक श्रीरंग बरगे या वेळी उपस्थित होते.
  • शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठांना सवलतीचे साधे कार्ड मिळत असल्याने बनावट कार्ड बनवून अनेक जण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली.
  • नाव नोंदणीवेळी स्मार्ट कार्डसाठी 55 रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल. नोंदणीसाठी वयाचा पुरावा व महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा सोबत आणावा लागणार आहे. त्यात वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अशा कोणत्याही पुराव्यांपैकी एक आणि आधारकार्ड गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दिनविशेष:

  • 6 मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन’ आहे.
  • सन 1840 मध्ये बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • राष्ट्रपती के.आर. नारायण यांच्या हस्ते सन 1999 यावर्षी जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • सन 2000 मध्ये शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.
  • देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे 6 मार्च 2005 रोजी सुरु झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.