6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs

Bank Of Baroda
Bank Of Baroda

6 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 जानेवारी 2021)

कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स :

 • वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्या 2020 च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे.
 • तर याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी त्याचे अभिनंदन करुन भोरे यांना प्रमाणपत्र दिले आहे.
 • सन 2018 व 2019 वर्षा मध्ये पाच हजारपेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वच्छता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षणसाठी त्याचबरोबर 800 पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले, मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल.
 • तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी 2020च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही “कराटे एक्स्पर्ट” म्हणून केलेली आहे.

बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा :

 • सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 • बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अकाउंट बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस माहिती, चेकबुकसाठी विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने व सेवांविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
 • बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील. तर यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
 • तसेच, जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.

‘सेंट्रल व्हिस्टा’चा मार्ग मोकळा :

 • नवे संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन विरुद्ध एक अशा बहुमताने प्रकल्प उभारणीस हिरवा कंदील दाखवला.
 • तर या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबाबत प्रसृत करण्यात आलेली अधिसूचना वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • केंद्र सरकारने ‘डीडीए’कायद्याचा वापर करून या प्रकल्पासाठीच्या जमिनीच्या वापरासंबंधी केलेले बदल योग्य आहेत. त्याचा 20 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेत उल्लेख होता.
 • तसेच पर्यावरणविषयक परवानगीची तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस आणि त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला निर्णयही योग्य आहे, असे या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले.
 • सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा’प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून :

 • मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे.
 • त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल.
 • तर पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.
 • तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.
 • तसेच 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.

दिनविशेष :

 • 6 जानेवारीपत्रकार दिन.
 • 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
 • 6 जानेवारी 1673 मध्ये कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.
 • सॅम्युअल मॉर्स यांनी 6 जानेवारी 1838 मध्ये तारयंत्राचा शोध लावला.
 • 6 जानेवारी 1992 मध्ये न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.