6 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
6 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 जानेवारी 2019)
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 हजार रुपये भरणार:
- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासह कृषी क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणावर सवलती देण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
- तसेच सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10 हजार रुपये जमा करण्याच्या विचारात असून ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे.
- तर योजनेची घोषणा 26 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे.
- ओदिशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 10 हजार रुपये राज्य सरकारकडून भरण्यात येतात, त्यापोटी राज्य सरकारवर 1.4 लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. मात्र केंद्राच्या योजनेमध्ये सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश
होणार नसल्याची शक्यता आहे. - तसेच या योजनेतून भूमिहीन शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. भूमिहीन शेतकऱ्यांवर कर्ज नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
वन-डे सामन्यात ठोकले 13 षटकार मोडला जयसूर्याचा विक्रम :
- कसोटी क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे खेळपट्टीआवर टिकून खेळणे आवश्यक असते, त्याप्रमाणे वन-डे आणि टी20 क्रिकेटमध्ये अधिकाधिक धावा करणे आवश्यक असते. त्यामुळे निर्धारित षटकांच्या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून धावा जमवण्याकडे फलंदाजांकडे कल असतो.
- तर अशीच तुफानी खेळी श्रीलंकेच्या तिसरा परेराने खेळली. त्याने केवळ 74 चेंडूंमध्ये 140 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने तब्बल 13 षटकार लगावले आणि दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला.
- जयसूर्याने एका सामन्यात सर्वाधिक 11 षटकार खेचत सर्वाधिक षटकार मारणारा श्रीलंकेचा खेळाडू म्हणून विक्रम केला होता. तो विक्रम थिसारा परेराने मोडीत काढला.
विद्यार्थ्यांनी बनवली देशातील पहिली विनाचालक सौर उर्जेवरील बस :
- पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्टबस बनवली आहे. ही बस केवळ सौर उर्जेवरच धावणार असं नाही तर या बसमध्ये चालकाची गरजच नाहीये.
- तर 106 व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’मध्ये ही बस सादर करण्यात आली. पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे.
- तसेच चालकाशिवाय 30 किलोमीटर प्रतितास वेगाने ही बस धावू शकते. तसंच चालकासह बस चालवण्याचा पर्यायही यामध्ये आहे.
- बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा 10 मीटर आधीच अलर्ट देईल.
- एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या बसने 10 ते 30 प्रवाशांसह 70 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. नेव्हिगेशनसाठी जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा वापर केला जातो. 10 मीटरच्या परिसरातूनही या बसवर कंट्रोल करता येणं शक्य आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक :
- शहरांमधील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे हे स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांचे वैधानिक कर्तव्य आहे.
- तर त्या कर्तव्यात कसूर केल्याने भटके कुत्रे चाऊन एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल या दोघांनीही मृताच्या वारसांना भरपाई देणे बंधनकारक ठरते, असा नवा पायंडा पाडणारा निकाल मुंबईउच्च न्यायालयाने दिला आहे.
- दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी भरदिवसा केलेल्या हल्ल्यात तेजस मारुती हाळे या पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूबद्दल सांगली-मिरज-कुपवाड महापालिका व राज्य सरकार या दोघांना जबाबदार धरून न्या. अभय ओक
व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
मल्ल्या ठरला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार :
- बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग कायद्यान्वये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले.
- तर या कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आलेला तो पहिला उद्योगपती आहे. आता ईडीला त्याची संपत्ती जप्त करता येईल.
- नव्या कायद्यान्वये मल्ल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यासाठी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता.
दिनविशेष :
- 6 जानेवारी – पत्रकार दिन.
- 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- 6 जानेवारी 1673 मध्ये कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.
- सॅम्युअल मॉर्स यांनी 6 जानेवारी 1838 मध्ये तारयंत्राचा शोध लावला.
- 6 जानेवारी 1992 मध्ये न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा