6 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

6 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2022)

भारत पाचव्यांदा बनला जगज्जेता :

 • अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
 • तसेच भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे.
 • तर या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 • भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला.
 • राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला.
 • तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदावरून लँगरचा राजीनामा :

 • कठोर मार्गदर्शनशैलीबद्दल संघातील अनुभवी खेळाडूंच्या तक्रारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाच्या संचालक मंडळाशी मतभेद यामुळे जस्टिन लँगरने शनिवारी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
 • लँगरने मेलबर्नहून पर्थ येथील निवासस्थानी प्रयाण केले असून, लँगरशी करारबद्ध असलेल्या डीएसईजी या व्यवस्थापन कंपनीने ही घोषणा केली.
 • लँगरला अल्पमुदतवाढीचा करार देण्यासाठी मंडळ उत्सुक होते. पण हा प्रस्ताव त्याने फेटाळला.
 • साहाय्यक प्रशिक्षक अ‍ॅन्डर्य़ू मॅक्डोनाल्ड यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सला सीमांकन अहवाल अमान्य :

 • जम्मू-काश्मीरमध्ये काही नव्या मतदारसंघांची निर्मिती आणि काही मतदारसंघांची फेररचना सुचवणारा सीमांकन आयोगाचा दुसरा मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्सने शनिवारी नाकारला.
 • तर नव्या अहवालात या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा, तसेच जम्मू भागात सहा व काश्मीरमध्ये एक मतदारसंघ वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
 • सीमांकन आयोगाने सहयोगी सदस्यांना 4 फेब्रुवारीला उपलब्ध करून दिलेला मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्स तत्काळ नाकारत आहे, असे पक्षाचे प्रवक्ते इम्रान नबी दार म्हणाले.

दिनविशेष:

 • आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.
 • सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.
 • कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.