6 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

6 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2021)
पूर्वलक्ष्यी कर अखेर रद्द :
- पूर्वलक्ष्यी प्रभावाने आकारला जाणारा वादग्रस्त कर रद्द करण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने घेतला आहे.
- तर यासंदर्भातील करदुरुस्ती विधेयक गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडले.
- तसेच या दुरुस्तीनंतर व्होडाफोन व केर्न एनर्जी यासारख्या कंपन्यांनी पूर्वलक्ष्यीप्रभावाने भरलेला कर विनाव्याज परत केला जाईल.
- जुन्या व नव्या करप्रणालीमध्ये मोठी तफावत असेल आणि जुन्या करपद्धतीतील करांचे दर तुलनेत खूपच कमी असतील तर पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केली जाते व त्यासंदर्भात नव्या करपद्धतीत तरतूद केली जाते.
Must Read (नक्की वाचा):
कुस्ती मध्ये रवीला रौप्यपदक :
- रवी कुमार दहिया गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्यपदक पटकावणारा भारताचा दुसरा मल्ल ठरला.
- तर उपांत्य फेरीमधील दिमाखदार विजयामुळे सुवर्णपदकासाठी आशा उंचावणाऱ्या रवीचा रशियन ऑलिम्पिक समितीच्या विश्वविजेत्या झॅव्हूर युग्येव्हपुढे निभाव लागला नाही.
- पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात रवीने 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही झॅव्हूरकडून पराभव पत्करला होता.
- तसेच गुरुवारी पुन्हा झॅव्हूरने वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना रवीला 7-4 असे नामोहरम केले.
- तसेच रवीच्या आधी 2012 मध्ये सुशील कुमारने ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठताना रौप्यपदक जिंकले होते.
41 वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं कांस्यपदकावर कोरलं नाव :
- भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे.
- तर तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.
- अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव केला.
- भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.
- भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं.
- आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते.
दिनविशेष :
- 6 ऑगस्ट हा जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन तसेच अणुशस्त्र जागृती दिन म्हणून पाळला जातो.
- 6 ऑगस्ट 1925 हा दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतीदिन आहे.
- सन 1926 मध्ये ‘जेरट्रूड एडर्ले‘ ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
- 6 ऑगस्ट 1945 रोजी जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला होता.
- भारतीय पर्यावरणवादी ‘राजेंद्र सिंग‘ यांचा जन्म 6 ऑगस्ट 1959 रोजी झाला.