5 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय शिक्षक दिन
राष्ट्रीय शिक्षक दिन

5 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2022)

के. के. शैलेजा यांनी नाकारला प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार :

 • केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार नाकारला आहे.
 • करोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2022 सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता.
 • भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला आहे.
 • या पुरस्काराला आशियाचा नोबल पुरस्कार असे देखील संबोधले जाते.
 • 2016 ते 2021 या कालावधीत शैलेजा केरळच्या आरोग्य मंत्री होत्या.
 • याच काळात देशभरासह केरळात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार झाला होता. केरळमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैलेजा यांचे मोठे योगदान आहे.
 • फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.
 • ‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
 • सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना 1957 पासून हा पुरस्कार देण्यात येतो.

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा:

 • काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद कोणतं पाऊल उलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.
 • गुलाम नबी आझाद सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत.
 • या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
 • अद्याप नवीन पार्टीचं नाव ठरवलेलं नाही. मात्र, काश्मीरची जनताच पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवतील मात्र, माझ्या पक्षाला हिंदुस्तानी नाव देणार. जे सर्व लोकांना समजेल असं नाव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. झाद म्हणाले.

ओडिशाला पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचे जेतेपद :

 • बचावातील कमालीच्या संघर्षांनंतर निर्णायक क्षणात आक्रमणात चमक दाखवत ओडिशा जगरनॉट्स संघाने रविवारी पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचे विजेतेपद पटकावले.
 • म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेतील अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात ओडिशाने तेलुगु योद्धाजचे आव्हान 46-45 असे अवघ्या एका गुणाने परतवून लावले.
 • संपूर्ण सामना बचावाच्या आघाडीवर खेळला गेला असला, तरी निर्णायक क्षणी ‘स्काय डाईव्ह’चा गुण मोलाचा ठरला आणि सुरज लांडेने ओडिशाला विजय मिळवून दिला.
 • विजेत्या ओडिशा संघाला रोख 1 कोटी, उपविजेत्या तेलुगु संघाला 50 लाख पारितोषिक देण्यात आले.

बांगलादेशच्या मुशफिकूरची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती :

 • बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक मुशफिकूर रहीमने रविवारी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
 • एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे मुशफिकूरने सांगितले.
 • मुशफिकूरने ‘ट्विटर’वरून निवृत्तीबाबतची घोषणा केली.
 • मुशफिकूरने बांगलादेशसाठी 102 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामने खेळताना 115.03 च्या धावगतीने 1500 धावा केल्या.

रोहित शर्माच्या नावे झाला ‘हा’ विश्वविक्रम :

 • भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सुरुवातीच्या दहा मिनिटात आपल्या नावे एक मोठा विक्रम केला आहे.
 • मैदानात येताच दोन षटकार ठोकून रोहित पहिल्या 12 धावांसह टी- 20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा काढलेला फलंदाज ठरला आहे.
 • यापूर्वी टी- 20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरुष खेळाडूंच्या यादीत रोहित अव्व्ल स्थानी होता मात्र महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स त्याच्यापेक्षा 11 धावांनी पुढे होती.
 • आजच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुंदर खेळीसह रोहितने महिला व पुरुष अशा दोन्ही यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे .
 • रोहित शर्माच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आजवर 134 सामन्यात 27 अर्धशतके आणि 4 शतकांसह 3520 धावा केल्या आहेत.
 • यादरम्यान त्याची सरासरी 32 आणि स्ट्राइकरेट 139.84 इतका आहे.

दिनविशेष :

 • 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
 • भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
 • भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
 • सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
 • सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.