5 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 October 2018 Current Affairs In Marathi

5 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2018)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौर्‍यावर:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक व्दिपक्षीय शिखर बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 4 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान एस-400 हवाई सुरक्षा प्रणालीसह अवकाश आणि ऊर्जा सारख्या महत्वाच्या क्षेत्रात अनेक करारांवर हस्ताक्षर होण्याची शक्यता आहे.
 • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुतिन यांचे स्वागत केले. त्यानंतर पुतिन थेट लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासाकडे गेले. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
 • 19व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनात दोन्ही नेत्यांमध्ये विविध व्दिपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर व्यापक चर्चा होईल. यामध्ये मॉस्कोच्या विरोधात अमेरिकन निर्बंध आणि दहशतवाद विरोधी सहकार्याचाही समावेश आहे.
 • रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पण आले आहे. यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरिसोव, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव्ह यांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2018)

देशाचे नवे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आरएन रवी:

 • संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष आर.एन. रवी यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोवाल यांच्या टीममध्ये आता 3 उपराष्ट्रीय सल्लागार झाले आहेत.
 • केरळ केडरच्या 1976च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी रवी हे नागा उग्रवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-आयएम) बरोबर सुरु असलेल्या चर्चेत सरकारचे प्रतिनिधीही आहेत. R N Ravi
 • सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने आर एन रवी यांच्या उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (अंतर्गत प्रकरणे) नेमणुकीस मंजुरी दिली आहे.
 • गुप्तचर पथकाचे माजी प्रमुख अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. डोवाल यांच्या टीममध्ये उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची संख्या वाढून ती 3 इतकी झाली आहे. रवी यांच्याशिवाय राजिंदर खन्ना आणि पंकज सरण हे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

जागतिक बँकेकडून काही कंपन्यांवर बंदी:

 • पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून देशातून पळून गेलेला उद्योजक नीरव मोदी नंतर आता आणखी एकाने भारताचे नाव बदनाम केले आहे.
 • जागतिक बँकेने काही भारतीय कंपन्या आणि लोकांवर बंदी घातली आहे. यामध्ये जय मोदी हा एक आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालामुळे ही माहिती समोर आली आहे.
 • तसेच या अहवालानुसार, जागतिक बँकेने भारताची ऑलिव्ह हेल्थ केअर आणि जय मोदीवर फसवणूक केल्याप्रकरणी बंदी घातली आहे.
 • बंदी घातलेल्या कंपन्याच्या यादीत भारताची अँजेलिक इंटरनॅशनल लि., फॅमिली केअर, मधुकॉन प्रोजेक्टस लि., आरकेडी कन्स्ट्रक्शन्स लि.चा समावेश आहे.

श्रीमंत भारतीयाचा मान पुन्हा मुकेश अंबानी यांनाच:

 • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलर असून, चालू वर्षात त्यामध्ये 9.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे.Mukesh Ambani
 • अंबानी यांच्यापाठोपाठ ‘विप्रो’चे चेअरमन अझिम प्रेमजी यांनीही आपले दुसरे स्थान कायम राखले असून, त्यांची एकूण संपत्ती 21 अब्ज डॉलर इतकी आहे.
 • ‘अर्सेलर मित्तल’चे चेअरमनमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत तिसऱ्या स्थानी असून, त्यांची एकूण संपत्ती 18.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
 • तसेच हिंदूजा ब्रदर्स आणि पालनजी मिस्त्री हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती अनुक्रमे 18 व 15.7 अब्ज इतकी असल्याची माहिती फोर्ब्सने दिली.

संदीप बक्षी असणार आयसीआयसीआय बॅंकचे नवे सीईओ:

 • खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
 • चंदा कोचर यांनी बँकेतून लवकर निवृत्ती घेतली असून, बॅंकेनेही त्यांची निवृत्ती स्विकारली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने चंदा कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
 • तसेच चंदा कोचर यांच्याजागेवर संदीप बक्षी असणार आहेत. संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी हे पद देण्यात आले आहे.
 • चंदा कोचर यांच्याविरोधात व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोचर सध्या सक्तीच्या रजेवर होत्या. चंदा कोचर यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार आहे, अशी माहिती बॅंकेने दिली.

दिनविशेष:

 • 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
 • सन 1955 मध्ये पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
 • मीरासाहेब फातिमा बिबी या सन 1989 मध्ये सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या होत्या.
 • कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना सन 1995 जाहीर झाला होता.
 • सन 1998 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.