5 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

5 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 मे 2022)

इस्रोची शुक्रावरील मोहिमेसाठी तयारी सुरू :

 • चंद्र आणि मंगळावर यान पाठवल्यानंतर, सौर मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे हे पाहण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळयान पाठवण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.
 • शुक्राला वेढून असलेल्या गंधकयुक्त आम्लयुक्त (सल्फ्युरिक अ‍ॅसिड) ढगांखालील रहस्यांचा शोध घेणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे.
 • शुक्र मोहिमेवर विचार झालेला आहे, तिचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे व तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे ‘शुक्र विज्ञानावरील’ एक दिवसाच्या बैठकीला संबोधित करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.
 • तर ही मोहीम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करणे आणि त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे असे लक्ष्य ठेवण्याचा इस्रोने विचार केला आहे.
 • तसेच या वर्षांत पृथ्वी व शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे, की प्रणोदकाचा (प्रॉपेलंट) कमीत कमी वापर करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे.
 • तर अशा प्रकारची स्थिती त्यानंतर 2031 साली उपलब्ध राहणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मे 2022)

लहान मुलांसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ वर्धक मात्रेच्या चाचणीसाठी अर्ज :

 • ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वर्धक मात्रा म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यासाठी ‘भारत बायोटेक’ कंपनीने देशाच्या औषध नियामकांकडून परवानगी मागितली.
 • सध्या, कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींची दक्षता मात्रा (प्रिकॉशन डोज) ज्यांनी पहिल्या मात्रेनंतर 9 महिने पूर्ण केले आहेत अशा 18 वर्षांवरील सर्वाना दिला जातो.
 • हैदराबाद येथील भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची सुरक्षितता, प्रतिक्रियाजन्यता आणि रोगप्रतिकारक क्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी 2 ते 18 वर्षे वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांसाठी वर्धक मात्रा म्हणून या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील
 • चाचणी करण्याकरिता भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) 29 एप्रिलला अर्ज केला होता.

‘आयसीसी’ वार्षिक क्रमवारीत भारत ट्वेन्टी-20 मध्ये अव्वल :

 • मायदेशातील दिमाखदार कामगिरीच्या बळावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2021-22च्या हंगामाअखेरीस ट्वेन्टी-20 क्रिकेट क्रमवारीचे अग्रस्थान टिकवले आहे.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत मात्र भारत नऊ गुणांनी पिछाडीवर पडल्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
 • तसेच न्यूझीलंड वार्षिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल संघ ठरला.
 • ट्वेन्टी-20 क्रमवारीत पाच गुणांच्या फरकाने इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या वार्षिक कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतापासून नऊ गुणांची आघाडी मिळवली आहे.
 • तर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
 • न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत तिसऱ्या तर, दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे.

आयपीएलमध्ये ‘असा’विक्रम करणारे फक्त दोघे :

 • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 49 वा सामना चेन्नई आणि बंगळुरु या संघांमध्ये खेळवला जातोय.
 • तर प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी बंगळुरु संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
 • चेन्नई संघाचीही अशीच स्थिती आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे.
 • तर महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून आज 200 वा सामना खेळत आहे.
 • महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीमध्ये म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून आज 200 वा सामना खेळतोय.
 • याआधी 200 किंवा 200 पेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता.

भारतीय फुटबॉल महासंघाची ‘कॅग’कडून चौकशी :

 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची दखल आता थेट केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.
 • त्यामुळे देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी पथक नेमून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याचे निर्देश बुधवारी दिले.
 • भारतीय फुटबॉल महासंघाच्या गेल्या चार आर्थिक वर्षांच्या कागदपत्रांचे लेखापरीक्षण करण्यासाठी ‘कॅग’ने एक पथक नेमले आहे.

दिनविशेष :

 • 5 मे : युरोप दिन
 • कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.
 • 5 मे 1901 मध्येपं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
 • पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.
 • 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.