5 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 May 2019 Current Affairs In Marathi

5 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 मे 2019)

फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले :

  • ओदिशानंतर फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले.
  • पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता ओदिशापेक्षा कमी झाली असली तरी पश्चिम बंगालमध्ये ताशी 90 किलोमीटरच्या वेगाने वादळ धडकले आहे. तसेच फॅनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • तर ताशी 175 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाने ओदिशात जोरदार तडाखा दिला. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मे 2019)

जीएसपी योजना रद्द केल्यास अमेरिकी कंपन्यांनाही फटका :

  • भारताबरोबर निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची भीती असल्याने अमेरिकेने सार्वत्रिक अग्रक्रम योजना रद्द (जीएसपी) करू नये, असे आवाहन 25 काँग्रेस सदस्यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधींना केले आहे. तर
    भारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली आहे.
  • तसेच सार्वत्रिक अग्रक्रम योजना हा अमेरिकेचा जुना कार्यक्रम असून त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. त्याचा लाभ भारतालाही होत आहे.
  • 4 मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले,की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही.
  • तसेच त्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली असून त्या पाश्र्वभूमीवर 25 अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी ही योजना रद्द न करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न केले आहेत.

‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे.
  • फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.
  • भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे.
  • तसेच फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.
  • तर ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती.
  • हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

भारत करणार चांद्रयान-2 चं प्रक्षेपण :

  • भारताची महत्वाकांक्षी मोहिम असणाऱ्या चांद्रयान-2 चं लवकरच प्रक्षेपण केलं जाणार आहे.
  • तसेच 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने 1 मे रोजी यासंबंधी घोषणा केली आहे.
  • जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने चांद्रयान-2 चं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
  • श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण केलं जाणार असून 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लॅण्डर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे तीन प्रमुख भाग असणार आहेत.
  • तसेच चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळं होईल. यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावरु उतरेल आणि यानंतर पुन्हा रोव्हर त्याच्यापासून वेगळा होईल.
  • ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आण सेन्सर्स असणार आहेत. अशाच पद्धतीने रोव्हरमध्येदेखील अत्याधुनिक उपकरणं असतील. हे दोघे मिळून चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मिनरल्स आणि इतर गोष्टींची माहिती पाठवतील. जी माहिती पाठवली जाईल त्याचा इस्त्रो अभ्यास करणार आहे.

दिनविशेष :

  • 5 मे : युरोप दिन
  • कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.
  • 5 मे 1901 मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.
  • 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.