5 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन

5 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जून 2020)

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी :

  • राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी देत सर्व परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे.
  • तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला.
  • तसेच विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी कौतुक केले. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा 15 जूलै ते 15 आगष्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा 16 आगष्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.
  • तसेच उपरोक्त दोन्ही पयार्यांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार आॅनलाईन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जून 2020)

कोरोना लसीसाठी भारतानं केली कोट्यवधींची मदत जाहीर :

  • कोरोनाच्या संकटाचा जगातील अनेक देश सामना करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस विकसित करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न चालवले आहेत. तर काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचाही दावा केला आहे.
  • तर त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ब्रिटनच्या वतीने आयोजित कोरोना लसीकरण समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय वॅक्सीन गठबंधन असलेल्या गावीला 15 मिलियन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे.
  • तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जगभरातील राष्ट्रांना मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी 15 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री बेस वापरणार भारत :

  • गुरूवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली.
  • तर या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत.
  • तसेच “हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीचे नवे मॉडेल आहे,” असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारानंतर केला.
  • याबैठकीतदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. तसंच यावेळी आरोग्य सेवा, व्यवसाय आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्य पंतप्रधानांनी चर्चा केली.
  • नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजं आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. तसंच गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे.
  • हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाहता तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं अमेरिकेसोबतही असाच एक करार केला आहे.

दिनविशेष :

  • 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे.
  • भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला.
  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म 5 जून 1908 रोजी झाला.
  • भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण
  • मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ 5 जून 1980 रोजी टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.