5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs

ख्रिस्तियानो रोनाल्डो
ख्रिस्तियानो रोनाल्डो

5 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जानेवारी 2021)

रोनाल्डोकडून पेले यांचा विक्रम मोडित :

 • ख्रिस्तियानो रोनाल्डोने ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा 757 गोलचा विक्रम मोडित काढला.
 • रोनाल्डोने आतापर्यंतच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या सामन्यांत नोंदवलेल्या अधिकृत गोलांची संख्या 758 झाली असून त्याच्या दोन गोलमुळेच युव्हेंटसने झालेल्या सेरी-ए लीग फुटबॉलमधील सामन्यात उडिन्सला 4-1 अशी धूळ चारली.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोनाल्डोने 31व्या मिनिटाला पहिला गोल झळकावून पेले यांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
 • तर उत्तरार्धात 70व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून त्याने पेलेंचा विक्रम मोडित काढला.
 • तसेच आता फक्त माजी फुटबॉलपटू जोसेफ बिकान रोनाल्डोपेक्षा पुढे आहेत.

ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा :

 • पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे.
 • तर जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं.
 • तसेच फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे.
 • करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच :

 • औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 • तर या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
 • तसेच ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड 19 लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे.
 • भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड 19 लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

दिनविशेष:

 • महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.
 • 5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
 • पश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.
 • सन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.
 • ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ ‘गेरहार्ड फिशर‘ यांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात
 • भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.