5 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 January 2020 Current Affairs In Marathi
5 January 2020 Current Affairs In Marathi

5 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जानेवारी 2020)

ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ :

 • राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.
 • तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.
 • तसेच या क्रमनिहाय येणाºया संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.

इरफानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

 • भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
 • Star Sports वाहिनीच्या एका कार्यक्रमात इरफानने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीची अखेर करत असल्याचं जाहीर केलं.
 • तर इरफानने आतापर्यंत 120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
 • तसेच 2006 साली पाकिस्तान दौऱ्यात इरफान पठाणने कसोटी सामन्यात हॅटट्रीक नोंदवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. इरफानने सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धात ज्योतिबा, रामचंद्र, सागर यांना सुवर्ण :

 • ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (57 किलो) आणि सोलापूरच्या रामचंद्र कांबळे (79 किलो) यांनी गादी विभागात तर माती विभागात पुण्याच्या सागर मारकडने (61 किलो) सुवर्णपदक पटकावले.
 • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत गादी विभागातील 79 किलो गटाच्या अंतिम फेरीत रामचंद्रने उस्मानाबादच्या रवींद्र खैरेवर 14-3 अशी मात केली.
 • तर अहमदनगरचे केवल भिंगारे व साताऱ्याच्या श्रीधर मुळीक यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबाने कोल्हापूरच्या रमेश इंगवलेला चीतपट केले.

दिनविशेष:

 • महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.
 • 5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
 • पश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.
 • सन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.
 • ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ ‘गेरहार्ड फिशर‘ यांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.